तेव्हा आपण बघू या काही घरगुती उपाय.-1) कोरफडीचा गर लगेच लावा. अगदी थंडावा मिळतो व जखम भरून यायला मदत होते.2) हळदीचे पाणी लावावे.शुद्ध खोबरेल तेलात हिरड्या चे चूर्ण मिसळून तिथे लावा. जखम भरून यायला मदत होते.3) कच्च्या बटाट्याचा रस तिथे लावा. फफोला येत नाही
4) शुद्ध खोबरेल तेलात तुळशीच्या पानांचा रस मिसळून फेटून घ्या व तिथे लावा आग थांबते व फोड येत नाही.5) गायीचे शेण तिथे लावा लगेच बरे वाटेल.6) डाळिंब व चिंच एकत्र वाटून हा लेप तिथे लावावा. फोड येत नाही. किंवा डाळिंब झाडाची पाने वाटून तिथे लावा लगेच बरे वाटते.7) बाभळीचा डिंक पाण्यात घोळुन हे पाणी भाजलेल्या जागेवर लावल्यास फोड येत नाही.
8) पिकलेले केळे कुस्करून भाजलेल्या जागेवर लावल्यास आग होत नाही व फोडही येत नाही 9) मुलतानी माती ओली करून तिथे लावल्यास आग होत नाही व फोड येत नाही 10) पांढऱ्या कोहळ्याच्या पानांचा रस तिथे लावा. लगेच बरे वाटते.11) मेंदीची पाने वाटून हा लगदा तिथे लावावा. थंडावा मिळतो व फोड येत नाही.
Published on: 20 May 2022, 04:54 IST