कांदा आरोग्यासाठी फायदेशीर असल्याकारणाने कांद्याला सुपर फूड म्हटले जाते. जेवणाला स्वाद आणण्यासाठी कांदा उपयुक्त आहे. भारतीय घटकातील महत्त्वाचा घटक आहे. कांद्याच्या बाबतीत अनेकांना कांद्याचे फायदे माहित आहेत परंतु त्याच्या नुकसानाविषयी जास्त माहिती नाही. असे फारच कमी लोक आहेत ज्यांना कांद्याचे नुकसान माहिती आहेत. जास्त प्रमाणात कांदा खाल्ला तर शरीराला त्याची नुकसान होते. तर मग या लेखात पाहू जास्त कांदा खाल्ल्याने काय नुकसान होते.
कांद्यामध्ये एंटीऑक्सीडेंट, विटामिन्स आणि मिनरल्स जास्त प्रमाणात असते. हे शरीरासाठी फारच फायदेशीर आहे. परंतु जास्त प्रमाणात सेवन केल्यास त्याच्यापासून काही नुकसान होते. आयुर्वेदामध्ये कमीत कमी प्रमाणात कांद्या खाण्याचा सल्ला दिला जातो. कारण जास्त प्रमाणात खांदा सेवन केल्याने व्यक्तीचे लक्ष विचलित होते.
हेही वाचा :रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यास उपयुक्त आहे कारले
पोटाविषयी समस्या
कांद्यामध्ये नॅचरल फ्रुकटोज जास्त प्रमाणात असते. त्यामुळे गॅस समस्या उत्पन्न होते. त्यामुळे जास्त प्रमाणात कांदा सेवन करू नये.
तोंडाचा वास येणे
कच्च्या कांद्याचा जास्त प्रमाणात सेवन केल्यास तोंडाचा वास येऊ लागतो.
पोटदुखीचे कारण
जास्त प्रमाणात कांदा सेवन केला तर पोटदुखीचे समस्या उद्भवते. कारण जास्त कांदा खाल्ल्याने शरीरात फायबरची मात्रा वाढते. त्यामुळे पोटदुखीचे समस्या निर्माण होते.
कांद्याची आरोग्य विषयक फायदे.
कांदा खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ शरीराच्या बाहेर टाकण्यास मदत होते. पचनाची क्रिया सामान्य होते. सर्दी आणि खोकला साठी कांदा उपयुक्त आहे.
Published on: 27 December 2020, 07:10 IST