मनुके हे आपल्या सगळ्यांच्या परिचयाचे आहेत.मनुके खाने आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.आपल्याला माहित आहेच कि द्राक्ष वाळवून त्यापासून मनुके तयार केले जातात.त्यांच्यामध्ये विविध प्रकारची जीवनसत्वे आणि भरपूर प्रमाणात खनिजे आढळतात.
जे आपल्याला आरोग्यदायी ठेवण्यास मदत करतात तसेच आरोग्याशी संबंधित असलेल्या अनेक समस्यांपासून मुक्तता मिळवून द्यायचे महत्त्वाचे काम मनुके करतात. जर आपण मनुक्याचे पाणी पिलो तर शरीरास बऱ्याच प्रमाणात फायदा तर होतोच परंतु ऊर्जा देखील मिळतेआणि व्यक्ती ताजेतवाने राहते.
मनुके भिजवून खाल्ल्याने होणारा फायदा
1-यामुळे आपले वजन कमी होण्यास आणि बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत होते.
2-मनुक्यमध्ये विटामीन बी कॉम्प्लेक्स आणि तांबे मोठ्या प्रमाणात असते.हे दोन्ही घटक रक्त वाढविण्यास मदत करतात.त्यामुळे अशक्त असलेल्यारुग्णांनी मनुकांचे सेवन करणे फायद्याचे आहे.
आपल्याला माहित आहेच कि कॅल्शियमची कमतरता शरीरामध्ये राहिली तर हाडे देखील कमकुवत होतात.अशावेळी मनुक्याचे सेवन केल्याने फायद्याचे असते कारण मनुक्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते तसेच बोरॉननावाचा एक घटक सुद्धा आहे. जोहाडांमध्ये कॅल्शियम वहन करण्यासाठी कार्य करतो.जर तुम्हाला हाडे मजबूत ठेवायचे असतील तर दररोज मनुके खाणे योग्य आहे.
4-स्त्रियांनी तर दररोज कोणत्याही परिस्थितीत मनुके खावीत.
5-आपल्या शरीरातून खराब कोलेस्टेरॉल काढून टाकून हृदयाचे आरोग्य सुधारते.
जर रिकाम्यापोटी मनुका चे पाणी प्यायले तर वजन देखील कमी होण्यास मदत होते.
7- मनुक्या मध्ये भरपूर प्रमाणात फ्रुकटोज आणि ग्लुकोज असते,त्यामुळेआपल्या शरीरातील ऊर्जा टिकून राहते.
8-मनुक्यामध्ये फायबर देखील भरपूर असते त्यामुळे आपले पोट भरते.
टीप-कुठलाही औषधोपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Published on: 15 December 2021, 06:53 IST