तूप आणि मध हे दोन्ही मानवी आरोग्यासाठी फायदेशीर असतात. मात्र असे असले तरी तूप आणि मध एकत्र खाल्ले तर आरोग्याला याचा विपरीत परिणाम सहन करावा लागणार आहे. खरं पाहता, आयुर्वेदात अनादी काळापासून आहाराशी संबंधित नियम देण्यात आले आहेत. आयुर्वेदात अशा अनेक पदार्थांच्या मिश्रणाबद्दल सांगितले आहे, ज्यांचे एकत्र सेवन आरोग्यासाठी अत्यंत हानिकारक ठरू शकते.
आयुर्वेदामध्ये सांगितले गेले आहे की, तूप आणि मध एकत्र सेवन करणे आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. दोन्ही पदार्थांचे वेगवेगळे सेवन करणे आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते, परंतु या गोष्टी एकत्र घेतल्यास आरोग्यासाठी हानिकारक आहे. जाणून घेऊया मध आणि तूप एकत्र खाल्यास आरोग्यावर काय वाईट परिणाम होऊ शकतात.
हेही वाचा:-खरं काय! शिळी चपाती खाल्ल्याने आपल्या शरीराला मिळतात अनेक आश्चर्यकारक फायदे; वाचा याविषयी
तूप आणि मध एकत्र खाल्ल्याने आरोग्यावर होणारे विपरीत परिणाम:- मध आणि तूप एकत्रित आणि समान प्रमाणात सेवन केल्यास पोटात तीव्र वेदना होऊ शकतात. यामुळे पोटासंबंधित विकार होण्याची दाट शक्यता असते.
आयुर्वेदानुसार, मध आणि तूप एकत्र खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात. मध आणि तूप एकत्र खाल्ल्याने त्वचेची समस्या देखील प्रकर्षाने उद्भवण्याचा धोका असतो. या दोन्ही पदार्थांचे एकत्रित सेवन केल्यास तुम्हाला त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे इत्यादी समस्या उद्भवू शकतात.
मध आणि तूप एकत्र घेतल्याने डोके देखील दुखू शकते. मध आणि तूप एकत्र खाल्ल्यास वजन वाढण्याचा देखील धोका असतो यामुळे मध आणि तूप एकत्रित सेवन करणे टाळावे. नाही तर आपणास गंभीर समस्येला तोंड द्यावे लागू शकते.
हेही वाचा:-कांदे खाण्याचे इतके फायदे आहेत? शरीरातील पाण्याची कमतरता देखील करतो कमी, उन्हाळ्यात उपयोगी
Disclaimer:- सदर आर्टिकल केवळ सामान्य माहिती प्रदान करते. या लेखात दिलेली माहिती कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. सदर लेखात दिलेल्या माहितीवर अंमल करण्यापूर्वी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.
Published on: 03 April 2022, 02:27 IST