Health

लिव्हर म्हणजेच यकृत हा शरीरातील एक खूप महत्त्वाचा भाग असून आपण खाल्लेले अन्न पचन करण्याचे आणि शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्याचे काम लिव्हरच्या माध्यमातून पार पाडले जाते. बऱ्याच व्यक्तींना अल्कोहोलचे सेवन आणि जंक फूड खाण्याची सवय असते.त्यामुळे तुमच्या लिव्हरचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते.

Updated on 26 September, 2022 4:53 PM IST

लिव्हर म्हणजेच यकृत हा शरीरातील एक खूप महत्त्वाचा भाग असून आपण खाल्लेले अन्न पचन करण्याचे आणि शरीरातील हानिकारक पदार्थ काढून टाकण्याचे काम लिव्हरच्या माध्यमातून पार पाडले जाते. बऱ्याच व्यक्‍तींना अल्कोहोलचे सेवन आणि जंक फूड खाण्याची सवय असते.त्यामुळे तुमच्या लिव्हरचे आरोग्य बिघडण्याची दाट शक्यता असते.

लिव्हरमध्ये बिघाड झाल्यास भूक लागत नाही, मळमळते तसेच वजन कमी होते व शरीराला अशक्तपणा येतो. या लेखामध्ये आपण लिव्हरला आरोग्यदायी ठेवण्यासाठी काही फळे उपयुक्त ठरतात. याबद्दल आपण या लेखात माहिती घेऊ.

नक्की वाचा:Health Tips : नेहमीच तोंड येत कां? मग तोंड आलं की हे घरगुती उपाय करा, लगेचचं आराम मिळणार

लिव्हरच्या आरोग्यासाठी उपयुक्त फळे

1- एवोकॅडो- जर आपण या बाबतीत अमेरिकन केमिकल सोसायटीच्या संशोधनाचा विचार केला तर हे फळ लिव्हरला नुकसान होण्यापासून वाचवू शकते. यामध्ये ग्लुटाथिओन नावाचा घटक असतो तो डिटॉक्सीफाय करते आणि कार्य सुधारते.

2- सफरचंद- जर तुम्ही दररोज एका सफरचंदाचे सेवन केले लिव्हर निरोगी राहण्यास मदत होते व आरोग्य चांगले राहते. ताजे सफरचंद खाणे हे निवडच आरोग्यासाठी पुरेसे आहे. सफरचंदामध्ये असलेल्या अँटी इन्फलामेटरी गुणधर्मामुळे लिव्हर निरोगी राहते. सफरचंदामध्ये पॉलिफिनॉल असतात जे कोलेस्टेरॉल नियंत्रित करतात.

नक्की वाचा:Health Update: मुळव्याध आहे तर 'या' पदार्थांचे सेवन केल्याने पडू शकतो आराम, वाचा या बद्दल डिटेल

3- केळी- लिव्हरच्या चांगल्या आरोग्यासाठी केळी खाणे खूप परिणामकारक ठरू शकते.ज्या व्यक्तींचे लिवर फॅटी आहे अशा व्यक्तींनी केळी खावी.

केळीमध्ये मोनोअनसॅच्युरेटेड फॅट्स आणि ओमेगा 3 फॅट्स असतात. लिव्हरच्या निरोगीपणा साठी महत्वाचे आहेत. जर तुम्ही रोज सकाळी अनाशापोटी एक ते दोन केळी खाल्ली तर ते आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे आहे.

4-द्राक्षे- द्राक्षाचे सेवन केल्यामुळे लिव्हरच्या आरोग्य खूप उत्तम राहते. द्राक्षामध्ये असलेल्या विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट गुणधर्मांमुळे लिव्हरच्या पेशी निरोगी राहतात व यामध्ये दाहकविरोधी गुणधर्म आहे. त्यामुळे दररोज द्राक्ष खाल्ले तर लिव्हर निरोगी राहते.

नक्की वाचा:बापरे! समोसे खाल्ल्याने आरोग्यावर होतात 'हे' घातक परिणाम, वाचून बसेल धक्का

English Summary: eatin this is some fruit is so benificial for good health of liver
Published on: 26 September 2022, 04:53 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)