पपई हे फळ पौष्टिकतेने समृद्ध आहे, यात अनेक औषधी गुणधर्म देखील आहेत. पोषक तत्वांची भरपूर मात्रा असणारे हे फळ अनेक रोगांपासून रामबाण उपाय आहे. अनेकजण भूक वाढविण्यासाठी बिअर पिण्याचा सल्ला देतात. पण याचे व्यसन जडण्याची शक्यता असते. जर आपण बिअर पेक्षा फळे खाल्ली तर आपल्याला अधिक फायदा होईल आणि आपले आरोग्य निरोगी राहिल. यात पपई असे फळ आहे ज्याच्या सेवनाने पचनक्रिया आणि भूक वाढविण्यास मदत होते. पपई पिकलेली किंवा कच्ची खाल्ली तरीही त्याचे बरेच फायदे आहेत. आज आपण पपईचे फायदे या लेखात जाणून घेणार आहोत.
पपईमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, कॅरोटीन, फायबर, पोटॅशियम, तांबे, कॅल्शियम आणि विविध प्रकारचे अँटी ऑक्सिडेंट्स असतात. पपईमध्ये काही प्रमाणात प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्स देखील असतात. एका लहान पपईमध्ये सुमारे ६० कॅलरी असतात. पपईमध्ये व्हिटॅमिन सी, अँटीऑक्सिडेंट्स आणि फायबर समृद्ध असतात. त्यात असलेले फायबर कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यात खूप प्रभावी आहे.यामुळे आपले हृदय निरोगी रहाते .
जर तुम्हाला वजन कमी करायचे असेल तर मध्यम आकाराच्या पपईचे सेवन करणे फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन सी, फोलेट आणि पोटॅशियम आढळून येते .पपई मध्ये आढळणारे पॅपेन एंझाइम पचन करण्यास मदत करते . पपईमध्ये कोलेस्ट्रॉल आणि चरबी नाही या प्रमाणात आढळते , ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. पपईचे सेवन केल्याने शरीरात अनेक आवश्यक घटकांची पूर्तता होते . शरीरात व्हिटॅमिन सी देखील भरपूर प्रमाणात मिळते, जे पांढर्या पेशी तयार करण्यास उपयुक्त आहे.यामुळे शरीराची रोगप्रतिकार शक्ती वाढते .
पपईमध्ये डोळ्यांसाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन ए आढळून येते यात कॅरोटीनोईड ल्यूटिन आहे, जे डोळ्याला निळ्या प्रकाशापासून वाचवते. हे डोळयातील पडदयाचे संरक्षण करते आणि मोतीबिंदू विरूद्ध देखील लढा देते.डोळ्याचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते .
पपईमध्ये असलेल्या घटकांमध्ये लाइकोपीन, कॅरोटीनोईड्स, अँटीऑक्सिडेंट्स, बीटा-क्रिप्टोक्साथिइन आणि बीटा कॅरोटीन इत्यादींचा समावेश आहे.हे घटक कर्करोग रोखण्यासाठी महत्वाची भूमिका बजावतात. पपईमध्ये अनेक पचन एंझाइम्स आणि पापाइनसह अनेक आहारातील तंतू असतात. हे पचन तंत्राला उत्तेजन देण्याचे कार्य करते, ज्यामुळे पचक प्रणाली पूर्णपणे कार्यरत राहते. त्यात बीटा कॅरोटीन, व्हिटॅमिन ई आणि फोलेट आढळतात.
कच्ची पपई खाण्याचे फायदे
कच्च्या पपईचे सेवन यकृत आणि कावीळच्या रुग्णांसाठी फायदेशीर आहे. म्हणून कावीळ झालेल्या रूग्णांनी कच्च्या पपईचे सेवन करावे. व्हिटॅमिनच्या कमतरतेने हाडेदुखी आणि अशक्तपणाचे जाणवू शकतो. कच्च्या पपईचे सेवन केल्यास बर्याच मोठ्या जीवनसत्त्वांची कमतरता दूर होते. संशोधनात असे दिसून आले आहे की कच्च्या पपईत सर्व औषधी गुणधर्म असतात. सर्व प्रकारची पोषक द्रव्ये भरपूर प्रमाणात आढळतात. म्हणून बाळाला जन्म दिलेल्या मातेला याच्या सेवनाने भरपूर फायदा होतो.
Published on: 24 August 2020, 11:29 IST