आपल्या दैनंदिनी जीवनात आणि आहारात लसणाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो. दररोज च्या वेळी जेवण बनवताना लसणाचा वापर मसाल्याचा पदार्थ म्हणून केला जातो. जेवणात लसणाचा वापर केल्यामुळे जेवणाला चव येते याचबरोबर जेवण रुचकर लागते. तसेच आपल्या शरीराला लसणाच्या सेवणामुळे अनेक आरोग्यदायी फायदे सुद्धा होतात.
उपाशीपोटी लसूण खाल्ल्यामुळे शरीरास होणारे फायदे:-
1)हृदय निरोगी राहते:-दररोज लसणाचे सेवन केल्यास आपलं हृदय तंदुरुस्त राहते तसेच हृदयविकार सारख्या आजारापासून धोका टळतो. उपाशीपोटी लसूण खाल्ल्याने आपल्या शरीरातील रक्ताच्या गाठी नाहीश्या होतात. दररोज लसून आणि मध यांचे मिश्रण करून त्याचे सेवन केल्याने शरीरातील रक्तवाहिन्यांमध्ये जमा झालेली चरबी नष्टहोते, त्यामुळे आपले रक्ताभिसरण सुरळीत राहते.
2)उच्च रक्तदाबापासून मुक्ती : ज्यांना व्यक्तींना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे, त्यां लोकांनी सकाळी उपाशीपोटी पोटी लसूणाचे सेवन करावे. लसणाच्या नियमित सेवनामुळे आपले रक्ताभिसरण नियंत्रणात राहते.
3)दातदुखीत आराम मिळेल : लसूण आपल्या शेतीराला आणि शरीराच्या अनेक अवयवाला खूप फायदेशीर ठरते आहे. जर का तुमचे दात सतत दुखत असतील तर दररोज एक लसणाची पाकळी दुखणाऱ्या दातावर लावा आणि चोळा. त्यामुळे काही वेळातच दातदुखी पासून कायमचा सुटकार मिळेल आणि दात सुद्धा मजबूत राहतील. तसेच रिकाम्या पोटी लसणाचे सेवन केल्यामुळे रक्तवाहिन्यांमधील मुंग्या येणे कमी होते.
4) खोकला आणि सर्दीपासून आराम : बऱ्याच वेळा वायरल इन्फेक्शन मुळे आपण सतत आजारी पडत असतो अश्या काळात लसणाचे सेवन करणे खूप फायदेशीर ठरते. लसणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे सर्दी, खोकला आणि सर्दीमध्ये लसून रिकाम्या पोटी खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. याशिवाय अनेक वेगवेगळ्या आजारांवर लसूण खूप प्रभावी औषध म्हणून मानला जातो. त्यामध्ये , दमा, न्यूमोनिया आणि ब्राँकायटिस हे आहेत.
5. पोटाची समस्या दूर होते : लसणाच्या 2 पाकळ्या जर तुम्ही उपाशीपोटी खाल्ल्या तर आपलयाला पोटाच्या विकारांपासून सुटका मिळते तसेच शरीरातील पचनक्रिया सुधारून भूक वाढीस मदत होते.
Published on: 13 February 2022, 11:04 IST