या धावपळीच्या काळात अनेक लोकांना आळस, थकावट सारख्या समस्या घेरून घेतात आणि त्यामुळे अशा माणसांना अनेक मानसिक तसेच शारीरिक आजाराना सामोरे जावे लागते. जर आपणही अशा समस्यांमुळे हैराण असाल आणि आळसमुळे आपले कामात लक्ष लागत नसेल तर आपण सोयाबीन सेवन करून ह्या समस्याला मात देऊ शकता.
सोयाबीनमध्ये प्रोटीन मोठ्या प्रमाणात उपलब्ध असते. अनेक लोक शाकाहारी जेवण करणे पसंत करतात अशा लोकांना मटण, मासे, अंडे हे खाता येत नाही, पण अशा लोकांसाठी सोयाबीन मांसाहारचा पर्याय बनू शकतो. कारण असे सांगितलं जाते की, सोयाबीन मध्ये मटण, मासे, अंड्याइतकेच पोषक घटक उपलब्ध असतात. आणि म्हणुनच डॉक्टर शाकाहारी लोकांना सोयाबीन आपल्या आहारात समाविष्ट करायला सांगतात.
सोयाबीनमध्ये अनेक पोषकतत्वे असतात, जसे की, प्रोटीन, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन बी 12, मॅग्नेशियम, कॅल्शियम, आयरन आणि पोटॅशिअम. हे पोषक तत्वे आपल्या शरीरासाठी खुपच फायदेशीर असतात त्यामुळे याचे सेवन केले पाहिजे असे सांगितलं जाते. मित्रांनो असे सांगितले जाते की 100 ग्राम सोयाबीन मध्ये जवळपास 37 टक्के प्रोटीन असते, तर 100 ग्राम मांस मध्ये फक्त 26 टक्के प्रोटीन असते म्हणून सोयाबीन हे मटण पेक्षा अधिक चांगले प्रोटीन स्रोत असल्याचे सांगतात.
सोयाबीन खाल्ल्याने होणारे आश्चर्यकारक फायदे
»सोयाबीन हे डायबेटीस असलेल्या रुग्णांना खुप फायद्याचे ठरते, कारण याच्या नियमित सेवनाने मधुमेह नियंत्रणात राहु शकतो.
»सोयाबीनमध्ये कॅल्शियम मोठया प्रमाणात आढळते आणि कॅल्शियम हे पोषक तत्व हाडे मजबूत करण्याचे काम करते. त्यामुळे ज्या लोकांना हाडे, सांधे दुखतात त्यांनी सोयाबीन खावेत.
»सोयाबीनमध्ये अनेक प्रकारची जीवनसत्त्वे जसे की बी 6 आणि बी 12 आढळतात तर यात अनेक खनिजे देखील आढळतात जसे की मॅग्नेशियम, आयरन इत्यादी तसेच सोयाबीनमध्ये प्रथिने देखील असतात, ह्या सर्व्यामुळे मधुमेह नियंत्रित राहण्यास मदत होते.
»मित्रांनो सोयाबीनमध्ये अनेक पोषक घटक आढळतात जे की वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडतात, म्हणुन लठ्ठपणा असलेल्या माणसांना सोयाबीनचे नियमित सेवन करण्याचा सल्ला हा दिला जातो, माणसाचे यामुळे वजन नियंत्रित येते आणि साहजिकच वजन नियंत्रणात असले तर हृदय निरोगी राहते. त्यामुळे सोयाबीन हे नियमित खाल्ले पाहिजे.
»सोयाबीनचे सेवन हे आळस आणि थकवा या दोहोपासून लांब ठेवते परिणामी व्यक्तीचे मानसिक संतुलन सुधारण्यात मदत होते, मानसिक संतुलन चांगले असले की व्यक्तीचे मन देखील चांगले तीक्ष्ण बनते.
Published on: 27 November 2021, 09:04 IST