Health

जेव्हापण सुकामेवा चा विषय निघतो तेव्हा सर्वात अगोदर आठवते ते बदाम! बदाम खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळतात. यात असलेले पोषक घटक मानवी शरीरासाठी खूपच उपयुक्त असल्याचे सांगितले जाते. आहारतज्ञ हिवाळ्यात बदामाचे सेवन करण्याचा सल्ला देतात. बदाम हे गरम असल्याने याचे सेवन हिवाळ्यात फायदेशीर असते. मित्रांनो जर आपण बदामातील पौष्टिक घटकांचा विचार केला तर यात प्रथिने, ऊर्जा, फायबर, कॅल्शियम, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, फॉस्फरस, सोडियम, झिंक, व्हिटॅमिन बी-सिक्स, व्हिटॅमिन ई इत्यादी महत्त्वाचे पोषक घटक असतात जे की आपल्या शरीरासाठी उत्तम असल्याचे सांगितले जाते, बदामात असलेल्या पोषक घटकांमुळे आपल्या शरीरातील रोग प्रतिकारक क्षमता वाढते शिवाय याच्या सेवनाने आपले शरीर अनेक रोगांशी लढण्यास सक्षम बनते. जर सकाळी सकाळी रिकाम्या पोटी बदामाचे सेवन केले तर ते आपल्या शरीरासाठी अजूनच लाभकारी असल्याचे सांगितले जाते.

Updated on 29 December, 2021 8:46 PM IST

बदाम खाण्याचे आश्चर्यकारक फायदे-

  • डायबिटीज असलेल्या पेशंट साठी उपयोगी- मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की ज्या व्यक्तींना डायबिटीज चा प्रॉब्लेम आहे त्या व्यक्तीने बदामाचे सेवन अवश्य केले पाहिजे. कारण की बदाम मध्ये फायबर, लो कार्बोहायड्रेट, अनसॅच्युरेटेड फॅट्स असतात की जे कि टाईप टू डायबिटीज कमी करण्यास मदत करत असतात. तसेच जर अशा व्यक्तींनी सकाळी रिकाम्या पोटी बदामाचे सेवन केले तर त्यांच्या रक्तातील ग्लुकोजची मात्रा कमी होण्यास मदत होते.
  • मेंदूचे कार्य सुधारण्यासाठी मदत करते तसेच स्मरणशक्ती वाढवण्यास उपयोगी- मेंदूचे कार्य सुरळीतपणे चालू राहण्यासाठी तसेच स्मरणशक्ती वाढवण्यासाठी बदामाचे सेवन फायदेशीर ठरू शकते. बदामाचे सेवन केल्याने मेंदूचे आरोग्य स्वस्त राहते. आम्ही आपणास सांगू इच्छितो की जसजसे माणसाचे वय वाढत जाते तस तसे स्मरणशक्ती कमी होत जाते. म्हणून वयस्क माणसांसाठी बदामाचे सेवन उपयोगी ठरू शकते. बदामात पॉलीअनसैचुरेटेड फैटी एसिड आणि पॉलिफिनॉल्स नावाचे घटक असतात जे की आपली स्मरणशक्ती वाढवण्यास कारगर सिद्ध होतात. त्यामुळे सकाळी सकाळी बदामाचे सेवन मानवी आरोग्यासाठी आश्चर्यकारक लाभ प्राप्त करून देतात.
  • त्वचेसाठी आहे खूप फायदेशीर- बदामाचे सेवन मानवी त्वचेला अनेक रोगांपासून दूर ठेवू शकते. बदाम मध्ये असलेले anti-inflammatory गुणधर्म ड्राय स्कीन च्या समस्येपासून वाचवतात. तसेच या घटकांमुळे सोरायसिस आणि एक्सिमा सारख्या समस्यांपासून आराम  मिळू शकतो.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: eat badam in morning its very helpful for human body
Published on: 29 December 2021, 08:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)