दिवसभरात त्रास देणारी ॲसिडिटी, डोकेदुखी, अपचन व ब्लोटिंगपासून आपल्याला केळं वाचवतं.केळं हे मुळात 'प्रिबायोटिक' असल्यामुळे आपल्या आतड्याच्या स्वास्थ्याला जपते. दिवाळीच्या दिवसात फराळाचे पदार्थ जास्त खाल्ल्यामुळे होणारे त्रास, उदा. अपचन, ॲसिडिटी यांच्यापासून वाचवते. तेव्हा फराळ कराच पण केळं विसरू नका.मधुमेहाने त्रस्त असलेल्यांसाठी केळं हे एक वरदान आहे. मधुमेहींवर नेहमीच सफरचंदांचा मारा केला जातो. जी साखर सफरचंदात आहे तीच केळ्यातही आहे. तिला 'फ्रुक्टोज' म्हणतात.
ही फ्रुक्टोज रक्तातील साखर आटोक्यात आणण्यास मदत करते.American Diabetes Association ने सुध्दा केळ्यला मान्यता दिली आहे. केळ हे पूर्ण अन्न आहे. केळ आपण जेवणाबरोबर किंवा नंतरही खाऊ शकतो.बंदोबस्त' सारख्या महत्त्वाच्या आणि अतिशय थकवणाऱ्या कामाच्या दिवसांमध्ये केळं आपल्याला डिहायड्रेशन व पायांत गोळे येण्यापासून वाचवते, जो त्रास आल्याला जास्त काळ उभे राहिल्याने होतो.केळ्यात असलेला खनिजांचा साठा ( minerals) ह्रदयाच्या ठोक्यांना नियंत्रित करण्यास मदत करतो. त्यामुळे ह्रदयविकाराने ग्रस्त असलेल्यांनी केळं खाल्लच पाहिजे.केळं हे फक्त पोटालाच नाही तर खिशालाही जपणारे आहे. जे सफरचंदाला जमणार नाही.
दिवसाची सुरुवात केळ्याने केल्याने दिवस भरात होणारा चहाचा अतिरेक कमी होतो.काही भेडसावणारे प्रश्न-1) केळ्यांवर केमिकल्सचा मारा असतो, मग कसे खाणार?आपल्या आसपास जी केळी होतात. त्या केळ्यांचे सेवन केल्यास ह्या समस्येवर मात करणे शक्य आहे. उदा. वेलची केळी, राजेळी केळी, हिरव्या सालीची केळी. तेव्हा आपल्या नेहमीच्या फळवाल्याला हिरव्या सालीची केळी आणायला प्रोत्साहित करा.2) केळ खाल्ल्याने वजन वाढतं ?आपल्या शरीराला कॅलरीज म्हणजे ऊर्जेची गरज सतत असते. ही ऊर्जा जेव्हा आपल्याला आपल्या आसपास पिकत असलेल्या फळांमधून मिळते. तेव्हा ह्या ऊर्जेचा शरीर पूर्णपणे व उत्तमरित्या उपयोग करते.
Published on: 21 May 2022, 09:06 IST