मानवी आहारात दुधाचा उपयोग मोठ्या प्रमाणात केला जातो. तसे त्याचे जबरदस्त फायदे सुद्धा आहेत. दुधामध्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्याला शरीराला मजबूत आणि तंदुरुस्त बनवण्याचे काम करतात तसेच दुधामध्ये कॅल्शियम चे प्रमाण जास्त असल्यामुळे हाडे मजबूत होतात.
म्हैशिच्या दुधापेक्षा शेळीचे दूध फायदेशीर:-
आजकाल बरेच लोक म्हैशीचे दूध वापरतात म्हैशिचे दूध हे चांगले आहे परंतु शेळीचे दूध आपल्यासाठी आणि आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरले जाते. बरेच लोक शेळीचे दूध पिताना नाक मुरडतात परंतु हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. शिवाय गाई आणि म्हैशीच्या दुधाच्या तुलनेत शेळीचे दूध उत्तम मानले जाते. तरीसुद्धा बरेच लोक शेळीचे दूध खाण्यासाठी टाळाटाळ करतात.
हेही वाचा:-सायनसच्या आजाराने आहात ग्रस्त, हे घरगुती उपाय करा आणि या आजारापासून व्हा मुक्त
शेळीचे दूध पिल्यामुळें शरीरास होणारे फायदे:-
1) शेळीचे दूध हे नवीन जन्मलेल्या बाळाच्या विकासासाठी खूप फायदेशीर ठरते शिवाय शेळीचे दूध नवजात बालकाला पाजल्यामुळे आतडी मजबूत होतात मदत होते.
2) नवजात बालकाला शेळीचे दूध पचवण्यासाठी सोप जाते शिवाय नवजात अभ्रकाची एमिनेम सिस्टमला मजबूत बनवण्यास फायदेशीर ठरते.
3) जर आतड्याला सतत सूज येत असेल तर त्या व्यक्तीने शेळीच्या दुधाचे सेवन करावे. शेळीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे आतड्या वरील सूज कमी होण्यास मदत होते.
4)शेळीच्या दुधामध्ये असणारे प्रोटीन अर्भकाच्या शारीरिक विकासासाठी खूप उपयोगी आहे.
5) शेळीचे दूध पिल्यामुळ पोटासंबंधित असलेल्या समस्या दूर होतात आणि आपली पचनक्रिया सुधारते.
हेही वाचा:-भारतात धवलक्रांतीचा पहिला टप्पा पार तर दुसऱ्या टप्यात दूध प्रकिया अपूर्ण, वाचा सविस्तर
6) शेळीच्या दुधाचे सेवन केल्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते आणि वेगवेगळ्या आजारापासून आपला बचाव होतो.
7) शेळीच्या दुधाला कॅल्शियम चा स्रोत मानले जाते यामधे मुबलक प्रमाणात कॅल्शियम आढळतात जे आपल्या शरीरातील हाडे मजबूत बनवण्यास मदत करतात.
8) शेळीच्या दुधाचे सेवन केल्याने शरीरातील कोलेस्ट्रॉल सुद्धा कंट्रोल मध्ये राहते आणि हृदय विकाराचा धोका सुद्धा कमी होतो
9) शेळीच्या दुधामध्ये पोटॅशियम असल्यामुळे ते आपल्या रक्तातील साखर कमी करण्यास मदत करतात. शिवाय रक्तदाब सुद्धा नियंत्रणात राहतो.
10) ज्या लोकांना डेंगू आणि चिकनगुनिया ची लागण झाली आहे या लोकांनी आहारामध्ये शेळीच्या दुधाचे सेवन करावे शेळीचे दूध आजारांमध्ये रक्तातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतात.
Published on: 02 October 2022, 09:24 IST