Health

उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक प्रत्येक करत असतो. वाढत्या वयात मधूमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भभवू नये म्हणून आधीच काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मनुके खात असाल तर ते आपल्यासाठी फार लाभकारी आहे हे तर आपल्याला माहिती आहे. पण जर तुम्ही मनुक्यांचे पाणी प्यायल तर तुमच्या शरीराला फार उपयुक्त आहे.

Updated on 04 March, 2020 4:05 PM IST


उत्तम आरोग्यासाठी आपण अनेक प्रत्येक करत असतो. वाढत्या वयात मधूमेह, लठ्ठपणा, उच्च रक्तदाब यासारख्या समस्या उद्भभवू नये म्हणून आधीच काळजी घेतली पाहिजे. तुम्ही मनुके खात असाल तर ते आपल्यासाठी फार लाभकारी आहे हे तर आपल्याला माहिती आहे. पण जर तुम्ही मनुक्यांचे पाणी प्यायल तर तुमच्या शरीराला फार उपयुक्त आहे. मनुक्यांच्या पाण्याचे नियमित सेवन केल्याने हृद्य रोगापासून तुम्ही वाचू शकतात. तसेच रक्तवाहिन्यांमध्ये कॉलेस्ट्रॉल कमी होते आणि स्ट्रोक, उच्च रक्तदाबाच्या समस्यांपासून तुम्ही वाचू शकता.

जर पोट साफ होण्याचा त्रास होत असेल तर रोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी पिण्याची सवय लावली पाहिजे. त्यामुळे गॅस एसिडीटीची समस्या दूर होण्यास मदत होईल. सतत पोट साफ व्यवस्थित होईल. किडनी स्टोन सारख्या गंभीर आजारांपासून सुध्दा मनुक्यांच्या पाण्याने लांब राहता येऊ शकत. मनुक्यात खूप मोठ्या प्रमाणात पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते. रोज या पाण्याचे सेवन केल्याने शरिरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात आणि किडनी निरोगी राहते.

शरिरातील विषारी पदार्थ बाहेर टाकून बॉडी डीटॉक्स करण्यासाठी मनुक्याचं पाणी पिणे गरजेचे आहे. मनुक्यांच्या पाण्यात आर्यन आणि कॉपर असतं. त्यामुळे जर तुमच्या शरीरात रक्ताची कमतरता असेल किंवा एनिमियासारखे आजार झाले असतील तर पाण्याच्या सेवनाने रक्ताची कमतरता भरून काढण्यासठी मनुक्याच्या पाण्याचा फायदा होत असतो.

English Summary: drinking raisins included water increased blood percentage
Published on: 04 March 2020, 02:49 IST