Health

अनेकांना नुसत्या दुधाचा घट्ट चहा आवडतो. मात्र, असा चहा पिणारे स्वत:हूनच वेगवेगळ्या आजारांना निमंत्रण देत असतात.

Updated on 20 May, 2022 4:12 PM IST

कमीत कमी दूध नि जास्त पाणी असणाराच चहा घ्यायला हवा. फक्त दुधाचा चहामुळे पित्त वाढते नि त्यातून डोकेदुखी, अपचन, मळमळणे, पोटफुगीसारखे विकार होऊ शकतात.सर्वात बेस्ट ब्लॅक टी (कोरा चहा), लेमन टी, आलं घातलेला चहा आणि एक नंबर गुळाचा चहा. आपणास 90% आजार पोटातून होतात. साखरेचा चहा टाळल्यास 45% आजार आपोआप नष्ट होतील. चहामुळे आरोग्यावर होणारे इतर तोटे जाणून घेऊ या..

चहाचे दुष्परिणाम.रोज 5-10 कप अति उकळलेला चहा पिल्याने पचनशक्ती बिघडते. आम्लपित्त, अल्सर, सांधेदुखी, अंगदुखी, मलावरोध असे विकार जडतात.भारतीयांमध्ये चहात साखर घालण्याचे प्रमाण जगात सर्वाधिक आहे. त्यामुळे बैठे काम करणाऱ्यांना मधुमेह, कोलेस्टेरॉल, हृदयविकार, स्थूलता असे विकार जडू लागतात.

अति प्रमाणात दूध-साखरविरहित चहा घेतल्यास रक्तदाब वाढणे, पक्षाघातासारखे विकार आणि शुक्राणूंची संख्या कमी होते. दूध, साखर नि चहाची भुकटी मिसळून उकळलेला चहा कफ, पित्त आणि वात वाढविणारा, उष्ण गुणांचा आहे.टपरीवर ॲल्युमिनियमच्या भांड्यात चहा उकळतात. ॲल्युमिनियमचा दीर्घ काळ संपर्क राहिल्याने

अल्झायमर (स्मृतीनाश) सारखा असाध्य विकार निर्माण होतो.चहामुळे रक्ताची आम्लता वाढते. हाडे ठिसूळ होतात. रक्तवाहिन्या आकुंचन पावून रक्तदाब वाढतो. आम्लपित्ताचा त्रास वाढतो.चहासोबत आपण काहीतरी खातो. अशा पदार्थांतील मिठाचा साखर व दुधाशी संपर्क आल्यामुळे चहा शरीरासाठी अपायकारक ठरतो.

English Summary: Drink strong milk tea? Then first read about these health effects
Published on: 20 May 2022, 04:12 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)