Health

Benifits Of Jaggery| आपण आपल्या आहारात नेहमीच गुळाचा समावेश करत असतो. अनेक लोकांना गुळाचा चहा पिणे अधिक पसंत असते. गुळामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यास खूप फायदेशीर असतात. गुळ खाल्ल्यानंतर लगेचच गरम पाणी पिल्याने मानवी शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात.

Updated on 12 March, 2022 2:54 PM IST

Benifits Of Jaggery| आपण आपल्या आहारात नेहमीच गुळाचा समावेश करत असतो. अनेक लोकांना गुळाचा चहा पिणे अधिक पसंत असते. गुळामध्ये असलेले औषधी गुणधर्म मानवी आरोग्यास खूप फायदेशीर असतात. गुळ खाल्ल्यानंतर लगेचच गरम पाणी पिल्याने मानवी शरीराला अनेक आश्चर्यकारक फायदे मिळत असतात.

आज आपण गुळ खाल्ल्यानंतर लगेचच गरम पाणी पिल्याने मिळणारे फायदे जाणून घेणार आहोत. चला तर मग मित्रांनो वेळ न दवडता जाणून घेऊया या विषयी.

गूळ खाल्ल्यानंतर लगेचच कोमट पाणी पिल्याने होणारे फायदे- पाचन तंत्र मजबूत करण्यास विशेष फायदेशीर - पचनसंस्थेशी संबंधित समस्या दूर करण्यासाठी गरम पाण्यासोबत गुळाचे सेवन करणे खूप फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. रोज सकाळी रिकाम्या पोटी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन केल्याने पाचन तंत्र सुधारण्यास मदत होत असते.

शरीरातील ऊर्जा वाढवण्यासाठी उपयुक्त - कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन केल्याने शरीरातील ऊर्जा वाढते आणि थकवा दूर करण्यासाठी फायदेशीर ठरते.  दिवसभराच्या कामात थकवा जाणवत असेल तर रोज सकाळी कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन करण्याचा सल्ला दिला जात असतो.

रक्त शुद्ध करण्यासाठी - कोमट पाण्यासोबत गुळाचे सेवन केल्यास रक्त शुद्ध होत असल्याचा दावा केला जातो.  असे सांगितलं जातं की, नियमितपणे गूळ खाल्ल्यानंतर गरम पाणी प्यायल्याने शरीरातील घाण साफ होते आणि रक्त साफ होण्यास देखील यामुळे मदत होते.

Disclaimer : सदर लेखात सांगितलेली विधी, पध्दती आणि दाव्यांचं Krishi Jagran Marathi कुठलंही समर्थन करत नाही. लेखात सांगितलेली माहिती केवळ एक प्राथमिक सल्ला आहे. अशा पध्दतीचा कोणताही उपचार / औषध / आहारावर अंमल करण्यापुर्वी आपल्या डॉक्टरांचा निदान एकदा सल्ला घेणे अनिवार्य राहणार आहे.

English Summary: drink hot water after eat jaggery learn more about it
Published on: 12 March 2022, 02:54 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)