आपल्या निरोगी आरोग्यासाठी फळे हिरव्यागार पालेभाज्या आणि सकस आणि पोषक अन्न खूप महत्वाचे आणि फायदेशीर असते. फळांमधून आणि पालेभाज्या मधून आपल्याला विविध प्रकारची जीवनसत्त्वे तसेच व्हिटॅमिन्स मिळतात जी आपल्या शरीराला खूप आवश्यक असतात.डाळिंब आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. कारण डाळिंबाचे सेवन केल्यावर आपल्या शरीराला असंख्य असे फायदे होत असतात. आपल्याकडे प्रत्येक ऋतू मध्ये डाळिंब मिळते परंतु हिवाळ्याच्या म्हणजेच थंडीच्या दिवसात डाळिंब खाल्ल्यामुळे शरीराला भरपूर फायदे होतात. म्हणून तर जास्तीत जास्त लोक हिवाळ्यामध्ये डाळिंबाचा रस पितात.
डाळिंबाचा रस पिल्यामुळे शरीरास असंख्य फायदे होतात. शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढते तसेच डोळ्यासंबंधीत असलेले आजार नाहीसे होतात. थंडीच्या दिवसात डाळिंबाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीराला उब मिळते. डाळिंबामध्ये व्हिटॅमिन, फायबर, व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन बी आणि व्हिटॅमिन सी आणि आयर्न यांचे प्रमाण मोठया प्रमाणात असल्याने आपल्या शरीराला फायदेशीर असतात.
डाळिंबाचा ज्यूस पिल्यामुळे होणारे जबरदस्त फायदे:-
1)रक्त दाब नियंत्रणात राहतो:-
डाळिंबाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते. ज्या लोकांना ब्लड प्रेशर चा त्रास आहे त्या व्यक्तींनी थंडीच्या दिवसात डाळिंबाच्या रसाचे सेवन करावे.
2)स्किन वर ग्लो येतो:-
आपल्या त्वचेला फायदेशीर असणारे व्हिटॅमिन सी हे डाळिंबामध्ये असल्याने त्याचा फायदा आपल्या त्वचेला होतो.डाळिंबाचा रस पिल्यामुळे आपल्या शरीरातील रक्त शुद्ध होते तसेच चेहऱ्यावर काळे डाग, वांग,पिंपल्स, सुरकुत्या नाहीश्या होतात. या साठी डाळिंबाच्या रसाचे सेवन करणे गरजेचे आहे.
3)पचनक्रिया तंदुरुस्त आणि मजबूत बनते:-
निरोगी शरीरासाठी पचनक्रिया योग्य असणे खूप गरजेचे आहे. तसेच पचक्रीया सुरळीत ठेवण्यासाठी डाळिंबाचा रस प्यावा.
4)हृदय तंदुरुस्त राहण्यास मदत होते:-
डाळिंबाचा रस पिल्यामुळे हृदयविकार चा धोका नाही सा होतो तसेच आपले हृदय मजबूत आणि तंदुरुस्त राहते. ज्या लोकांना हृदय विकाराचा त्रास आहे अश्या व्यक्तींनी नियमितपणे डाळिंबाचा रस प्यावा.
5) रक्तवाढिस फायदेशीर:-
शरीरातील रक्तवाढीस सर्वात फायदेशीर म्हणजे डाळिंबाचा रस आहे. जेवढे तुम्ही त्याचे सेवन कराल त्याच्या पटीत शरीरात रक्ताचे प्रमाण वाढत जाते त्यामुळं रक्त वाढवायचे असेल तर दररोज आहारात डाळिंबाचा रस प्यावा.
Published on: 03 February 2022, 11:37 IST