आपले आरोग्य निरोगी रहावे तसेच आपली शरीररचना व्यवस्थित असावी यासाठी कित्येकजण वजन कमी करण्यावर भर देतात. वजन कमी करत असताना लोक फळांचा देखील आपल्या आहारात समावेश करतात. फळे एकतर कच्ची खातात तर कधी त्यांचा रस प्यायला जातो. मात्र अलीकडेच एका तज्ञाने सांगितले आहे की वजन किंवा चरबी कमी करताना काही फळांचा समावेश टाळावा.
फळे आणि भाज्या आपल्या शरीराला आवश्यक पोषक, जीवनसत्त्वे, खनिजे प्रदान करतात, म्हणून दररोज आहारात यांचे सेवन करावे. तज्ज्ञांच्या मते, प्रत्येक व्यक्तीने सकाळच्या नाश्त्यात एक तरी फळ खावे तसेच हिरव्या भाज्यांचा आहारात समावेश करावा. WHOच्या मते, जे लोक दिवसातून किमान पाच वेळा फळे आणि भाज्या खातात त्यांना हृदयरोग तसेच काही प्रकारच्या कर्करोगाचा धोका कमी होतो.
शिवाय जे लोक वजन कमी करत आहेत ते देखील त्यांच्या आहारात फळे आणि भाज्यांचा समावेश करत आहेत. मात्र डॉक्टर आणि आहार तज्ज्ञ डॉ. मायकल मॉस्ले यांनी नुकतेच म्हटले आहे की, जर कोणाला वजन कमी करायचे असेल तर त्याने काही फळांचे सेवन करणे टाळावे. आता ती फळे कोणती आहेत. याबद्दल जाणून घेऊया.
रेश्मा नामक म्हशीची कमाल; ठरली देशातील सर्वाधिक दूध देणारी म्हैस
'द मिरर'च्या वृत्तानुसार, डॉ. मायकेल मॉस्ले सांगतात की, जर एखादी व्यक्ती निरोगी असेल तर त्याच्यासाठी फळे खाणे आरोग्याच्या दृष्टीने उत्तम आहे. मात्र असे व्यक्ती जे वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अशा लोकांनी सफरचंद, जांभूळ, द्राक्षे, किंवा एवोकॅडो यासारखी फळे खावीत कारण त्यात साखरेचे प्रमाण खूपच कमी असते. पण आंबा,टरबूज, अननस,केळी
यांसारख्या फळांचे सेवन करणे टाळावे कारण त्यात नैसर्गिक साखर खूप जास्त प्रमाणात असते.डॉ. मायकल मोस्ले यांच्या म्हणण्यानुसार, सामान्य आकाराच्या आंब्यामध्ये साधारण ४५ ग्रॅम, द्राक्षे २३ ग्रॅम, एवोकॅडो १.३३ ग्रॅम साखर असते. ज्यांना वजन कमी करायचे आहे त्यांनी आंबा केळी सारखी फळे खाणे टाळावे, पण ज्यांचे वजन कमी आहे त्यांनी, वजन वाढवण्यासाठी त्यांचे सेवन करावे.
आता शेतातली कामे होणार झटपट; मराठमोळ्या जोडप्याने तयार केले आगळे वेगळे मशीन
डॉ.मोस्ले म्हणाले, वजन कमी करण्यासाठी संपूर्ण फॅट, साखर, मीठ असलेले पदार्थ टाळावेत. याशिवाय पॅकेज केलेले अन्न देखील टाळावे. असे पदार्थ आरोग्यस हानिकारक आहेत. याशिवाय बिस्किटे किंवा चिप्स सारख्या गोष्टी खाणे टाळावे. वजन कमी करण्यासाठी या गोष्टी काटेकोरपणे पाळावेत तरच तसा रिझल्ट दिसेल.
महत्वाच्या बातम्या:
Cotton Seeds : राज्य सरकारच्या आडमुठेपणामुळे बियाणे खरेदीसाठी शेतकरी परराज्यात
Published on: 24 May 2022, 05:16 IST