Health

सध्या हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्टअटॅकचे प्रमाण खूप वाढले असून जगाचा विचार केला तर दरवर्षी जवळजवळ अठरा लाख लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकने होतो. जर आपण एकंदरीत वयोमानाचा विचार केला तर अगदी 35 च्या पुढे वय असलेल्या व्यक्तींमध्ये देखील हार्टअटॅकचे प्रमाण वाढताना दिसत आहे.आपण विचार केला तर बदललेली जीवनशैली,लठ्ठपणा आणि बरीच कारणे यासाठी कारणीभूत आहेत.

Updated on 23 August, 2022 4:03 PM IST

सध्या हृदयविकाराचा झटका म्हणजे हार्टअटॅकचे प्रमाण खूप वाढले असून जगाचा विचार केला तर दरवर्षी जवळजवळ अठरा लाख लोकांचा मृत्यू हार्ट अटॅकने होतो. जर आपण एकंदरीत वयोमानाचा विचार केला तर अगदी 35 च्या पुढे वय असलेल्या व्यक्तींमध्ये देखील हार्टअटॅकचे प्रमाण वाढताना दिसत आहे.आपण विचार केला तर बदललेली जीवनशैली,लठ्ठपणा आणि  बरीच कारणे यासाठी कारणीभूत आहेत.

हार्ट अटॅकचे एक वैशिष्ट्य म्हणजे हार्टअटॅक येण्याअगोदर आपल्या शरीरात काही लक्षणे जाणवतात किंवा त्याला आपण संकेत म्हटले तरी चालेल अशा पद्धतीचे संकेत किंवा लक्षणे शरीर दाखवते. परंतु आपण त्याकडे साफ दुर्लक्ष करतो किंवा आपल्याला ते समजत नाही.

या लक्षणांकडे जर आपण व्यवस्थित लक्ष दिले व त्वरीत उपचार केले तर आपल्याला हार्ट अटॅक पासून वाचता येणे शक्य आहे. या लेखात आपण त्यासंबंधी माहिती घेऊ.

नक्की वाचा:तुमचं हृदय किती वर्षाचं आणि किती निरोगी आहे पहा

 या लक्षणांकडे ठेवा लक्ष

1- छातीत दुखायला लागणे- हार्ट अटॅक येण्यापूर्वी छातीत असह्य वेदना व्हायला लागतात किंवा किरकोळ वेदना देखील होतात. या वेदनांकडे आपण एक छातीत दुखणे समजून दुर्लक्ष करतो. परंतु असे न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेऊन तपासणी करणे खूप गरजेचे आहे.

2- श्वास घेण्यास त्रास- जेव्हा आपण सामान्यपणे चालतो किंवा आपले दैनंदिन काम करतो त्यापेक्षा धावताना किंवा चालताना श्वास घेण्यास त्रास होणे किंवा पायर्‍या चढतांना श्वास घेण्यास त्रास होणे, ही लक्षणे बहुतांशी हार्ट अटॅकचे असू शकतात त्यामुळे वेळीच उपचार करणे गरजेचे आहे.

3- छातीत जळजळणे- आपण जेवण करतो तेव्हा पोटात जळजळ होते किंवा ऍसिडिटीमुळे देखील जळजळ व्हायला लागते. त्यामुळे आपण बहुतांशी होणारी जळजळ ऍसिडिटी मुळे होत आहे किंवा इनडायजेशन मुळे होत आहे असे समजतो व दुर्लक्ष करतो.

परंतु हे लक्षण कुठेतरी हृदयविकाराचा धोका उद्भवत आहे हे दर्शवतो. तसे पाहायला गेले तर सामान्यपणे छातीत होणारी जळजळ व हार्ट अटॅकची लक्षणे काहीवेळा सारखी असतात परंतु हे दोन्ही गोष्टी भिन्न आहेत परंतु सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून वरीलपैकी कुठलेही लक्षण दिसत असल्यास डॉक्टरांकडे दाखवणे खूप गरजेचे आहे.

नक्की वाचा:Health Information:बियर पिल्याने मुतखड्याचा त्रास खरच कमी होतो का? वाचा या संबंधीची महत्त्वाची माहिती

4- अचानक घाम येण्याचे प्रमाण वाढणे- कधीकधी वातावरणामध्ये गारवा असून देखील अचानक घाम यायला लागतो किंवा शरीर थंड होते. त्यामुळे अशा लक्षणांकडे दुर्लक्ष करणे देखील योग्य नाही.

5- उलटी होणे वा मळमळणे-हार्ट अटॅक येण्यापूर्वी व्यक्तीला उलट्या,मळमळणे किंवा चक्कर येणे अशा प्रकारच्या समस्या निर्माण व्हायला लागतात. थोडावेळ रेस्ट घेतली तर बरे वाटायला लागते. परंतु या लक्षणांकडे तर अजिबात दुर्लक्ष न करता पटकन डॉक्टरांशी संपर्क साधणे गरजेचे आहे.

(टीप- वरील माहिती ही विविध स्त्रोतांकडून घेतली असून या माहितीशी वैयक्तिक किंवा कृषीजागरण समूह सहमत असेलच असे नाही. कोणतेही उपाय करण्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

नक्की वाचा:हृदयाची काळजी घ्या, असे करा कमी कोलेस्टेरॉल

English Summary: dont ignore this symptoms can they are symptoms of heart attack
Published on: 23 August 2022, 04:03 IST