Health

आपल्याला एखादी गोस्ट जास्त आवडत असेल तर आपण ती गोष्ट सारखी खातो, अनेकांना याचा त्रास होतो. सध्या द्राक्षांचा हंगाम सुरु आहे. यामुळे बाजारात द्राक्ष विकण्यासाठी येत आहेत.

Updated on 19 February, 2022 4:09 PM IST

आपल्याला एखादी गोस्ट जास्त आवडत असेल तर आपण ती गोष्ट सारखी खातो, अनेकांना याचा त्रास होतो. सध्या द्राक्षांचा हंगाम सुरु आहे. यामुळे बाजारात द्राक्ष विकण्यासाठी येत आहेत. अनेकजण द्राक्ष आवडती म्हणून जास्त खातात, मात्र त्याआधी ही बातमी वाचा कारण जास्त प्रमाणावर द्राक्ष खाणे आता धोक्याचे ठरू शकते. याबाबत आता धक्कादायक कारणे समोर आली आहेत. आपण बघतो की द्राक्ष पिकवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर औषधांचा वापर करावा लागतो. अगदी वातावरणात बदल झाला की दिवसातुन चार चार वेळा औषधे मारावी लागतात. यामुळे अनेक आजारांना सामोरे जावे लागते.

द्राक्ष जास्त प्रमाणावर खाल्ली तर द्राक्षांमुळे मूत्रपिंडाच्या आजारांचा धोका अधिक वाढण्याची शक्यता असते. द्राक्षांचे सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते. यामुळे त्रास होण्याची शक्यता असते. तसेच यामध्ये जे लोक द्राक्षे जास्त प्रमाणात सेवन करतात, त्यांना पोटाशी संबंधित समस्या निर्माण होतात. यामध्ये अतिसाराचाही समावेश होतो. पोट आधीच खराब असलेल्या लोकांनी द्राक्ष खाणे टाळले पाहिजे. अनेक औषधे मारल्याने त्यामध्ये विविध घटक असतात. त्याचा शरीरावर विपरीत परिणाम होतो.

तसेच द्राक्षांचे अतिसेवन केल्यास त्वचेच्या विविध समस्या निर्माण होत असतात. त्वचेला खाज येण्याचा धोका निर्माण होउ शकतो. ज्या लोकांना कुठल्याही प्रकारच्या त्वचेशी संबंधित समस्या असतील त्यांनी द्राक्षांचा अतिरेक टाळावा. अ‍ॅलर्जीमुळे पाय आणि हातांना खाज सुटण्याची शक्यता असते. त्याच प्रमाणे चेहऱ्यावर सूज येण्याच्या तक्रारीही असू शकतात. यामुळे काळजी घेणे गरजेचे आहे. तसेच द्राक्षे खाल्ल्याने शरीरातील कॅलरीजचे प्रमाण वाढू शकते. वाढत्या कॅलरीजमुळे वजन वाढू शकते.

तसेच द्राक्षांमध्ये पॉलिफेनॉल नावाचे तत्व असते. याचे सेवन केल्याने स्वादुपिंडाचा त्रास निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या काळात द्राक्षांचे सेवन टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत असतो. यामुळे गरोदरपणात शक्यतो द्राक्ष खाण्याचे टाळावे. द्राक्ष तयार होण्याच्या दोन महिने आधी यावर खूपच जास्त प्रमाणावर औषधे मारली जातात. यामुळे आरोग्यास ती हानीकारण असतात. यामुळे ती खाण्याआधी व्यवस्थित धुवून घ्यावी.

English Summary: Dont eat too much as you like grapes.
Published on: 19 February 2022, 04:09 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)