Health

आपण जेव्हा आहार घेतो त्या आहाराचा सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम शरीरावर होत असतात. शरीराच्या आरोग्यासाठी तुमची जेवणाची वेळ हे देखील खूप महत्वाची भूमिका पार पाडते. परंतु बऱ्याचदा नको त्या वेळेला नको ते खायची सवय बऱ्याच जणांना असते व त्यामुळेच आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या उद्भवतात. रात्रीच्या वेळी साधारणतः आपण नित्याचा जो आहार असतो तोच घेतो.

Updated on 26 August, 2022 4:33 PM IST

आपण जेव्हा आहार घेतो त्या आहाराचा सकारात्मक किंवा नकारात्मक असे दोन्ही प्रकारचे परिणाम शरीरावर होत असतात. शरीराच्या आरोग्यासाठी तुमची जेवणाची वेळ हे देखील खूप महत्वाची भूमिका पार पाडते. परंतु बऱ्याचदा नको त्या वेळेला नको ते खायची सवय बऱ्याच जणांना असते व त्यामुळेच आरोग्याच्या बऱ्याचशा समस्या उद्भवतात. रात्रीच्या वेळी साधारणतः आपण नित्याचा जो  आहार असतो तोच घेतो.

साधारणतः ग्रामीण भागाचा विचार केला तर ग्रामीण भागांमध्ये भाजी पोळी किंवा भाजी भाकर हा सर्वोत्तम आहार घेतला जातो. परंतु शहरी भागाचा विचार केला तर बर्‍याचदा चमचमीत आणि जिभेचे चोचले पुरवण्यासाठी नको तो आहार रात्रीच्या वेळी घेतला जातो

व त्याचा विपरीत परिणाम आरोग्यावर होऊ शकतो. या लेखात आपण आता रात्रीच्या वेळी काही ठराविक पदार्थ खाल्ल्याने आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम कोणता होतो? याबद्दल माहिती घेऊ.

नक्की वाचा:Sweet Potato: रताळ्याचे सेवन केल्याने बीपी राहतो नियंत्रित; आणखी आहेत आश्चर्यकारक फायदे

 रात्रीच्या वेळी टाळा हे पदार्थ

1- तळलेले पदार्थ- जर आपण आरोग्य तज्ञांचा विचार केला तर रात्रीच्या वेळी आरोग्यासाठी हलके अन्न सेवन करणे खूप महत्त्वाचे असते. तुम्ही रात्री जेवढा हलका आहार घ्याल ना तेवढी तुमची शरीराची पचनसंस्था खूप उत्तम रित्या काम करते.

परंतु जर तुम्ही तळलेले पदार्थांचं सेवन केले तर त्याचा पचनसंस्थेवर दबाव पडून शरीरात जडपणा येतो आणि तुम्ही सकाळी उठल्यावर तुम्हाला ताजेतवाने वाटत नाही व या असल्या पदार्थांचा समावेश तुमच्या आहारात केल्याने आरोग्यावर देखील विपरीत परिणाम होऊ शकतो.

2- थायमीनयुक्त आहार- बऱ्याच जणांना निद्रानाशाची समस्या असते, अशा व्यक्तींना थायमिनयुक्त अन्न कमी खाण्याचा सल्ला दिला जातो.

यामध्ये जे काही अमिनो ऍसिड असते ते मेंदूच्या क्रियाकलापाना गती देतात व तुम्हाला झोप येत नाही. यासाठी चांगली झोप येण्यासाठी रात्रीच्या वेळी टोमॅटो,सोया सॉस आणि वांग्यासारख्या गोष्टींचा आहारात समावेश करणे टाळा.

नक्की वाचा:Health Information: 'या' लक्षणांकडे नका करू दुर्लक्ष,ठेवा लक्ष आणि टाळा हृदयविकाराचा झटका

3- साखरेने समृद्ध म्हणजेच बनवलेले पदार्थ- रात्री तुम्ही जेव्हा जेवण करतात तेव्हा यामध्ये साखर युक्त पदार्थ खाण्याचे टाळावे. कारण बऱ्याच जणांना जेवण केल्यानंतर स्वीट डिश खाण्याची आवड असते.

परंतु ही सवय तुमच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम करू शकते. त्यामुळे तुम्ही रात्रीच्या जेवणात कोणत्याही प्रकारची मिठाई किंवा साखरयुक्त तत्सम पदार्थ आणि आइस्क्रीम इत्यादी घेणे टाळा.

4- काही द्रव्ययुक्त पदार्थ-द्रवपदार्थ तसे शरीरासाठी चांगले असून शरीराला आवश्यक अशा गोष्टी त्यांच्या माध्यमातून मिळतात. परंतु रात्रीच्या जेवणात द्रवे पदार्थांचा समावेश नुकसानकारक ठरू शकतो. उदाहरणच घ्यायचे झाले तर तुम्ही फळांचा रस, टरबूज आणि काकडी यासारखे पदार्थ रात्री  घेतले तर तुमची पचनसंस्था बिघडू शकते.

नक्की वाचा:Health Information:बियर पिल्याने मुतखड्याचा त्रास खरच कमी होतो का? वाचा या संबंधीची महत्त्वाची माहिती

English Summary: dont eat this substance in night because they are harmful to health
Published on: 26 August 2022, 04:33 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)