Health

भारतात चहाला राष्ट्रीय पेय म्हणुन संबोधतात, प्रत्येक भारतीयाची दिवसाची सुरुवात चहा घेतल्यानेच होत असते. अनेकजण रिकाम्यापोटी (Empty stomach) चहाचे सेवन (Drink tea on an empty stomach) करत असतात. परंतु रिकाम्या पोटी चहा चे सेवन केल्याने आपल्या शरीराला अनेक दुष्परिणाम सहन करावे लागतात. तसं बघायला गेलं चहाला एनर्जी ड्रिंक (Energy drink) म्हणून ओळखले जाते मात्र असे असले तरी जर चहाचे रिकाम्या पोटी सेवन केले तर यापासून अनेक गंभीर आजार आपल्या शरीराला जडू शकतात. परंतु अनेक लोकांना चहाचे हे दुष्परिणाम माहीत नसतात म्हणून आज आपण रिकाम्या पोटी चहा चे सेवन केल्याने होणारे दुष्परिणाम जाणून घेणार आहोत. तसेच चहा किंवा कॉफी पिण्यासाठी योग्य वेळ नेमकी कुठली याविषयी देखील जाणून घेणार आहोत.

Updated on 02 January, 2022 8:32 PM IST

चहा आणि कॉफी मध्ये अमलीय घटक असल्याचे सांगितले जाते म्हणून चहाचे सकाळी सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्याने आपल्या शरीराचे एसिड बेसिक संतुलन बिघडू शकते. यामुळे आपणास ऍसिडिटी किंवा अपचन (Acidity or indigestion) यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागेल. चहा मध्ये थियोफिलाइन (Theophylline) नामक घटक असतो, यामुळे बद्धकोष्ठता (Constipation) होऊ शकते. सकाळी सकाळी रिकाम्या पोटी चहा चे सेवन केल्याने चहा मध्ये असणारी साखर तोंडातील बॅक्टरिया (Bacteria) ब्रेक करत असतात. त्यामुळे तोंडातील ऍसिडचा स्थर वाढतो, तसेच सकाळी सकाळी चहाचे सेवन केल्याने पोट फुगते.

सकाळी सकाळी चहाच्या ऐवजी करा या गोष्टींचे सेवन

सकाळी सकाळी चहा पिणे ऐवजी एक कप लिंबूच्या रसात (In lemon juice) एक चिमूटभर मीठ आणि काळी मिरी टाकून त्याचे सेवन करावे. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. तसेच यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) देखील कमालीची वाढते. आपण रोग प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी गिलोय अथवा आवळ्याच्या रसाचे देखील सकाळी सकाळी सेवन करू शकता.

चहा पिण्याची नेमकी योग्य वेळ कोणती

जर आपणास चहाची तलप असेल तर आपण सकाळचा नाश्ता झाल्यानंतर एक ते दोन तासांनी याचे सेवन करू शकता. चहा पितांना त्याच्यासोबत स्नॅक्स म्हणून नमकीनचे सेवन फायदेशीर ठरते. साधारणता व्यायाम करण्याच्या आधी (Before exercising) चहा पिण्याची शिफारस केली जाते.

यामुळे शरीरात उर्जेचा संचार (The transmission of energy) होतो तसेच व्यायाम करण्या आधी चहा पिल्याने कॅलरीज बर्न होतात. मित्रांनो झोपण्याच्या आधी कधीच चहाचे सेवन करू नये यामुळे झोप व्यवस्थित होत नाही.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: dont drink tea empty stomach otherwise it will be harmful for your health
Published on: 02 January 2022, 08:32 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)