जर तुम्हाला सर्दी झाल्यावर बेडका असेल व नाक वाहत असेल तर तुम्हाला घाबरायची गरज नाही कारण सुका खोकला व नाक वाहत नसेल तर अशी सर्दी कोरोना व्हायरस न्युमोनिया असू शकतो. सूर्यप्रकाशात जा, गरम पाणी प्या हा उपचार नसून प्रतिबंधात्मक उपाय आहे.
नोवेल कोरोना विषाणूने होणाऱ्या कोविड 19 या आजाराची महत्त्वाची लक्षणे:
- ताप
- कोरडा खोकला
- श्वास घ्यायला त्रास होणे
कोरना विषाणू बाधित व्यक्तीच्या संपर्कात आला असल्याचा संशय असेल तर खालील गोष्टींचा अवलंब करावा.
- पुढील 14 दिवसांसाठी सर्व लोकांशी संपर्क टाळा व वेगळ्या खोलीत राहा.
- शिंकताना वखोकताना नाकावर व तोंडावर रुमाल धरा.
- वारंवार आपले हात साबण व पाण्याचा वापर करून स्वच्छ धुवा.
- ज्या व्यक्तींमध्ये ताप कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास यांसारखी लक्षणे दिसत असतील तर त्यांच्यापासून किमान तीन फूट दूर रहा.
हात का व केव्हा धुवावेत?
- उन्हाळा सुरु होतो आहे हात नेहमीच घामेजलेले असतात. विविध वस्तुंशी हातांचा संपर्क येत असतो. त्यावेळी त्या वस्तुवरील घाण, रोगजंतू हातातील घामात मिसळतात. जेवणापूर्वी हात न धुतल्यास ही घाण व रोगजंतू थेट पोटात जाऊन विविध रोगास कारणीभूत ठरतात. त्यामुळे जेवणापूर्वी साबणाने हात धुणे महत्त्वाचे ठरते.
- स्वयंपाकापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक.
- बाळास भरविण्यापूर्वी साबणाने हात धुणे अत्यावश्यक.
- प्रवास संपल्यानंतर आपले हात साबणाने स्वच्छ धुवावेत.
- खोकल्यावरव शिंख आल्या नंतर.
- शौचानंतर.
हात कसे धुवावेत?
फक्त पाण्याने हात धुऊ नयेत. यासाठी पाण्याबरोबर साबणाचा वापर करावा. सुरुवातीस पाण्याने हात ओला करावा. त्यानंतर साबणाने तळहातावर फेस करावा. हा फेस बोटे, बोटांच्या खाची, तळहात व मनगटापर्यंत सुमारे २० ते ३० सेकंद चोळावा. नंतर हा फेस पाण्याने स्वच्छ धुवावा. त्यानंतर हात वाळवावेत किंवा स्वच्छ कापडाने पुसावेत.
मास्क कधी वापरावे?
- आपण जर संशयित कोरोना विषाणू संसर्ग असलेल्या व्यक्तींची काळजी घेत असाल तर.
- जर आपण खोकत किंवा शिंकत असाल तर.
हे करा
- साबण आणि पाण्याने हात स्वच्छ धुवा.
- कोणाच्या हातात हात देऊ नका.
- गर्दीच्या ठिकाणी तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी जाणे टाळा.
- शिंकताना खोकताना आपल्या नाकावर व तोंडावर रुमाल धरा.
- शक्यतो प्रवास टाळा.
- मांस आणि अंडी पूर्णपणे शिजवून व उकडून घ्या.
- लहान मुलांची काळजी घ्या, लहान मुलांना खेळण्यासाठी बाहेर पाठवू नका.
कोरोना आणि रोगप्रतिकारक्षमता
कोरोना विषाणूमुळे जो आजार होतो त्याचे नाव कोवीड 19 या आजारावर अजूनही औषध सापडले नाही त्यामुळे जगात हजारो लोक मरण पावले आहेत. पण दररोज हजारो लोक बरे होऊन घरीसुद्धा येतात कसे काय? हा प्रश्न आपल्याला नक्कीच पडतो कोरोनाची लागण झाली असून हे लोक बरे कसे व कशामुळे होतात. लागण झाल्यानंतर मृत्यूचे प्रमाण तीन टक्के आहे म्हणजेच शंभर जणांना झाला असेल तर तीन जणांचा जीव जातो. इतर लोक लगेच बरे होतात कारण त्यांच्या अंगात असलेली रोगप्रतिकारक्षमता.
रोगप्रतिकारक्षमता म्हणजे काय असते? ती वाढवता येऊ शकते का? जेव्हा आपल्या शरीरावर सूक्ष्मजीव हल्ला करतात तेव्हा आपण आजारी पडतो हे हल्ले आपल्यावर सतत आणि सगळीकडून होत असतात या हल्ल्यांना रोखण्यासाठी एक यंत्रणा आहे आणि यालाच रोगप्रतिकारक क्षमता म्हणजे immunity power असे म्हणतात. म्हणूनच यावर मात करण्यासाठी आपली प्रतिकारक्षमता चांगली असायला हवी.
रोगप्रतिकारक्षमता वाढवायची तर काय कराल?
- नैसर्गिकरित्या रोगप्रतिकारक क्षमता वाढवण्यासाठी दररोज ताजी फळे पालेभाज्या संतुलित आहार घ्यावा, त्याचबरोबर चालणे, धावणे असे व्यायाम आवश्यक.
- शिजवलेले अन्न खा, शक्यतो गरम पाणी प्या.
- पुरेशी झोप घ्या.
- योगा आणि प्राणायाम करा.
कोरोनाची लक्षणे आढळून आल्यास बेजबाबदारपणे वागू नये. उपचारासाठी आपल्या जवळील शासकीय रुग्णालयाशी संपर्क साधा.
- राष्ट्रीय कॉल सेंटर: +91-11-23978046
- राज्यस्तरीय नियंत्रण कक्ष: 020-26127394
- टोल फ्री हेल्पलाईन: 104
घरातून बाहेर पडू नका. घाबरू नका पण जागरूक रहा.
डॉ. पूनम राऊत
(परिविक्षाधीन वैद्यक, संजीवनी हॉस्पिटल, पुणे)
Published on: 27 March 2020, 06:10 IST