Health

आपल्या देशात सर्व्यानाच सण आणि काही विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी पुरी आणि पकोडे खायला आवडतात. पण सर्व स्वादिष्ट आणि कुरकुरीत तळलेल्या गोष्टींचा एक मोठा तोटा म्हणजे त्यात स्वयंपाकाचे तेल खूप वाया जाते. मात्र, नंतर ते उरलेले तेल आपण कोणताही पदार्थ बनवण्यासाठी वापरतो.

Updated on 18 May, 2022 10:34 PM IST

आपल्या देशात सर्व्यानाच सण आणि काही विशेष कार्यक्रमाच्या प्रसंगी पुरी आणि पकोडे खायला आवडतात. पण सर्व स्वादिष्ट आणि कुरकुरीत तळलेल्या गोष्टींचा एक मोठा तोटा म्हणजे त्यात स्वयंपाकाचे तेल खूप वाया जाते.  मात्र, नंतर ते उरलेले तेल आपण कोणताही पदार्थ बनवण्यासाठी वापरतो.

पण तुम्ही कधी विचार केला आहे का की जेव्हा आपण ते तेल पुन्हा पुन्हा वापरतो तेव्हा त्याचा आपल्या आरोग्यावर काय परिणाम होतो (Reheating Oil Effects)? नाही तर मग चला जाणून घेऊया या रिपोर्टमध्ये याविषयी बहुमूल्य माहिती.

तळलेले तेल पुन्हा वापरणे टाळा

तेल पुन्हा गरम करणे शक्यतो टाळावे असे तज्ञांचे मत आहे.  तळलेले तेल थंड करून त्याचा पुन्हा वापर केल्यास शरीरावर घातक परिणाम होतो. तज्ञांच्या मते, एखादी व्यक्ती तेलाचा किती वेळा सुरक्षितपणे पुनर्वापर करू शकते हे त्यामध्ये तळलेले अन्न कोणत्या प्रकारचे असते यावर अवलंबून असते.  ते कोणत्या प्रकारचे तेल आहे, ते कोणत्या तापमानाला आणि किती काळ गरम केले आहे हे देखील महत्त्वाचे असते.

Chewing Gum Side Effect: तुम्हालाही च्यूइंग गम खाणे आवडते का? मग सावधान! यामुळे आरोग्यावर होतात हे घातक परिणाम

विषारी वायू बाहेर निघतो 

उच्च तापमानाला गरम केलेले तेल विषारी धूर सोडते.  वापरलेले तेल धुराच्या बिंदूपर्यंत पोहोचण्यापूर्वी धूर सोडू लागते, म्हणजे व्यवस्थित गरम न करता आणि नंतर अचानक तापमान धुराच्या बिंदूच्या वर गेल्यावर ते जोरदार धूर सोडू लागते. FSSAI मार्गदर्शक तत्त्वांनुसार, तेल पुन्हा गरम करणे नेहमीच टाळले पाहिजे.

Ayurveda: आयुर्वेदनुसार, तांब्याच्या भांड्यात पाणी पिल्याने आरोग्याला मिळतात अनेक आश्चर्यकारक फायदे; वाचा

पुन्हा वापरल्याने या आजारांचा धोका वाढतो

उच्च तापमानात, तेलातील काही चरबी ट्रान्स फॅटमध्ये बदलतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, ट्रान्स फॅट्स आरोग्यासाठी हानिकारक असतात, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. जेव्हा तेलांचा वारंवार वापर केला जातो तेव्हा ट्रान्स फॅट्सचे प्रमाण आणखी वाढते, ज्यामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो. तेच तेल पुन्हा वापरल्याने अॅसिडिटी, हृदयविकार, कर्करोग, अल्झायमर रोग, पार्किन्सन्स रोग आणि घशाची जळजळ अशा अनेक समस्या उद्भवू शकतात.

Health Tips: हिंग टाकून दुध पिल्यास आरोग्याला होतात 'हे' आश्चर्यकारक फायदे; वाचून विश्वास बसणार नाही

English Summary: Do you use oil frequently? Then, beware! This can have serious consequences
Published on: 18 May 2022, 10:34 IST