Health

उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्ले जाणारे कलिंगड फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो.

Updated on 30 April, 2022 1:00 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत खाल्ले जाणारे कलिंगड फळ म्हणजे आपल्यासाठी एक वरदान आहे. उन्हाळ्याच्या दिवसांत प्रखर उष्णतेने अंगाची लाही लाही होते, त्या वेळी कलिंगडाच्या सेवनाने शरीराला शीतलता प्राप्त होते आणि अतिघामामुळे निर्माण झालेला थकवा दूर होऊन उत्साह निर्माण होतो. कलिंगडाला शास्त्रीय भाषेत ‘स्रिटलस व्हल्गॅरिस’ असे म्हणतात. उन्हाळ्याच्या दिवसात कलिंगड शरीरासाठी किती चांगलं असतं हे सांगायला नकोच. कलिंगडाचे अनेक चांगले परिणाम आपल्या शरीरावर होतात.

आपण या फळाच्या फायद्याविषयी जाणून घेणार आहोत.

मानवी शरीरात पाण्याची पातळी समतोल असणं अत्यंत गरजेचं आहे. कारण डिहाड्रेशन झालं तर थकवा येणं, डोकेदुखी व ब्लड प्रेशरही वाढू शकतं. यासाठी शरीरातलं पाण्याचं प्रमाण योग्य असणे आवश्यक असते.  कलिंगडात ९२ टक्के पाणी असतं. यामधून आपल्या शरीराला पाणी चांगले पाणी मिळते त्यामुळे कलिंगडाचा आहारात समावेश असायला हवा

अपचन, भूक वाढवणे तथा रक्ताची कमतरता असेल तर कलिंगड खूप लाभदायी ठरते. कलिंगड हे अल्कली गुणधर्माचे फळ आहे. त्यामुळे आम्लतेने निर्माण होणाऱ्या आजारांवर ते उपयोगी पडते. उष्णतेने निर्माण होणाऱ्या घामातून शरीरातील जलउत्सर्जन मोठय़ा प्रमाणात होते.

त्यामुळे शरीरातील खनिजे घामाद्वारे निघून जातात अशा वेळी थकवा जाणवतो. कलिंगड खाल्ल्याने तहान भागते व घामाद्वारे शरीरातील झालेला खनिज द्रव्यांचा ऱ्हास भरून येतो. कलिंगड शक्तिवर्धक, पौष्टिक, दाहशामक, पित्तनाशक आहे. त्याची साल, फळ व बी या तिघांचाही उपयोग केला जातो.  कलिंगडात पाण्याचं प्रमाण जास्त असत व कॅलरीज कमी असतात. त्यामुळे भरपूर कलिंगड खाल्लं तरी तुमच्या शरीरात फॅट्स वाढत नाहीत. आहारात कलिंगडाचा समावेश केला तर वजन कमी करण्यातही मदत होते.

कलिंगडामध्ये पोषणद्रव्यं असतात. कलिंगडात बीटा कॅरोटीन भरपूर असतात. याचंच पुढे जाऊन व्हिटॅमीन ए बनतं. यामुळे आपल्या त्वचेला आणि डोळ्यांचं आरोग्यही सुधारतं. कलिंगडात लिकोपेन असत कलिंगडातलं लिकोपेन शरीरात फार पटकन शोषलं जातं. अभ्यासांमधून असं दिसून आलंय की लिकोपेनमुळे कॅन्सर आणि टाईप - 2 डायबेटिजचा धोका कमी होतो.

महत्वाच्या बातम्या
कपाशीमध्ये पात्यांची व फुलांच्या संख्येत झपाट्याने वाढ करायची असेल तर 'स्टीमुलंट' आहे उपयोगी, जाणून घेऊ सविस्तर माहिती
सोमवारी नाशिक येथे राज्यपालांच्या हस्ते १९८ शेतकऱ्यांना कृषी पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.

English Summary: Do you know the tremendous benefits of eating watermelon?
Published on: 30 April 2022, 01:00 IST