आपण आपल्या दैनंदिन जीवनात नारळाचा उपयोग नेहमीच करत आलेलो आहोत. दैनंदिन जीवनात नारळाचा वापर बऱ्याच ठिकाणी आपण करतो. त्यामधे तेल, जेवण बनवताना इत्यादी.नारळापासून वेगवेगळे पदार्थ बनवले जातात तसेच नारळाचे तेल आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते त्याचरोबरीने जर का आपल्याला लांब आणि मजबूत केस, तजेलदार त्वचा आणि निरोगी आरोग्य पाहिजे असेल तर आआपल्या आहारामध्ये नियमितपणे न चुकता नारळाचा किंवा खोबऱ्याचा समावेश करावा.
नारळामध्ये आढळनारे पोषक घटक:-
नारळामद्ये अनेक पोषक घटक असतात जे आपल्या आरोग्यासाठी आणि शरीरासाठी खूप फायदेशीर असतात 100 ग्रॅम खोबऱ्या मधून आपल्याला कॅलरी - 345 , फॅट्स - 33 ग्रॅम, सोडिअम - 20 मिलिग्रॅम, पोटॅशिअम - 356 मिलीग्रॅम, कार्बोहायड्रेट्स - 15 ग्रॅम, साखर - 6 ग्रॅम, प्रोटीन - 3.3 ग्रॅम एवढे पौष्टिक घटक मिळतात. निरोगी आरोग्य पाहिजे असेल तर आआपल्या आहारामध्ये नियमितपणे न चुकता नारळाचा किंवा खोबऱ्याचा समावेश करावा.
नारळाचे आरोग्यदायी फायदे:-
1)खोबऱ्यामधून आपल्याला व्हिटॅमिन्स, मिनरल्स, मॅग्नेशिअम, प्रोटीन, अमीनो अॅसिड, फायबर, कार्बोहायड्रेट्स यांसारखी पोषक तत्व मुबलक मोठ्या प्रमाणावर मिळतात.
2) खोबरे खाल्ल्यामुळे आपल्या शरीरातील रोग्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.
3) खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे मेंदूला अधिक चालना मिळते. आणि मेंदू तीक्ष्ण बनतो.
4) शरीरातील पाण्याची कमतरता दूर होते आणि आपले शरीर हायड्रेट राहते.
5)नारळामध्ये असलेल्या फायबर मुळे बद्धकोष्ठासारख्या आजारांचा नायनाट होतो.
6) नारळाचे पाणी पिल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते तसेच थकवा नाहीसा होण्यास मदत होते.
7) नियमित खोबऱ्याचे सेवन केल्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.
हेही वाचा:-राज्यात या जिल्ह्यात मिळतोय नवीन कापसाला 16 हजार रुपये भाव, वाचा सविस्तर
8) नारळ कोलेस्ट्रॉलचा साठा मानलं जातो. त्यामुळे आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते आणि हृदयिकाराच्या आजारापासून बचाव होण्यास मदत होते.
9)यामध्ये फॅटी अॅसिड असल्यामुळे पचनक्रिया मजबूत आआणि सुरळीत राहते.
10) नारळामध्ये अॅन्टी-कॅन्सर आणि अॅन्टी-बॅक्टेरिअल गुणधर्म आढळतात. त्यामुळे बड्या आजारांपसून आपला बचाव होण्यास मदत होते.
11) तसेच जर का आपणास ॲसिदीटी चा त्रास असेल तर तुम्ही नारळाच्या पाण्याचे सेवन करणे फायदेशिर ठरते.
त्यामुळे दैनंदिन जीवनात कमीत कमी 2 चमचे तरी नारळाच्या तेलाचा वापर करा किंवा दिवसातून एकदा तरी खोबऱ्याचा तुकडा खावा यामुळे आपली रोग्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत होते शिवाय आपल्या शरीरास अनेक फायदे होतात
Published on: 03 September 2022, 03:11 IST