सगळे आपापल्या कामात व्यस्त असतात , या व्यस्त जीवन शैलीमुळे कोणाकडे पूर्ण आराम करायला वेळ नाही त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या व्याधीना सामोरे जावे लागते .कधी कधी ह्या वेदना असह्य होतात आणि वेळ नसल्यामुळे वेदना नाशक गोळ्या घ्यावा लागतात जेणेकरून त्यांना आपल्या पुढच्या कामाला लागता येईल . पण या गोळ्या घेतल्याने कायम स्वरूपी इलाज होत नाही तो तात्पुरता असतो आणि बऱ्याच
जणांना हे माहित नसते कि पुढे जाऊन त्यांना या वेदना नाशक गोळ्यांचे वाईट दुष्परिणाम होऊ शकतात .जास्त करून लोक वेदना नाशक गोळ्या का घेतात ?जेंव्हा आपल्याला वेदना होतात आणि त्या वेदना असहनीय होतात तेंव्हा त्या वेदनांपासून आराम मिळण्यासाठी आपण पेन किलर घेतो . कारण या गोळ्यांमुळे लगेचच आराम मिळतो आणि हळू हळू आपल्याला या गोळ्यांची सवय लागते , या गोळ्या जर आपण सतत घेत असू तर आपल्याला हे पुढे जाऊन धोकादायक ठरू शकते.
-पेन किलर जास्त प्रमाणात घेतल्याने रक्तदाब देखील कमी होतो .काही खास गोष्टी लक्षात ठेऊन आपण पेन किलर घेऊ शकता.-जेवल्यावर ३० मिनिटांनंतर ह्या गोळ्या घ्या.-पेन किलर कमीत कमी घेण्याचा प्रयत्न करा.-जर वेदना सारख्या सारख्या आणि असहनीय होत असतील तर डॉक्टर चा सल्ला घ्या.- पेन किलर नेहमी पाण्या सोबतच घेतल्या पाहिजेत.- पेन किलर च्या गोळ्या ह्या नेहमी डॉक्टर च्या सल्याने घेतल्या पाहिजेत.
Published on: 19 May 2022, 03:16 IST