Health

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी ३१२ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्‍हयात आहे.

Updated on 10 November, 2020 5:21 PM IST

व्‍यापारी दृष्‍टीने अंजीराची लागवड फकत महाराष्‍ट्रातच केली जाते. सध्‍या महाराष्‍ट्रात एकूण ४१७ हेक्‍टर क्षेत्र अंजीर लागवडीखाली असून त्‍यापेकी ३१२ हेक्‍टरपेक्षा अधिक क्षेत्र एकट्या पूणे जिल्‍हयात आहे. सातारा व पूणे जिल्‍हयाच्‍या शिवेवरील नीरा नदीच्‍या खो-यातील खेड-शिवारापासून जेजूरीपर्यंतचा (पुरंदर – सासवड तालुका) दहा - बारा   गावांचा परिसर हा अंजीर उत्‍पादनाचा प्रमुख भाग आहे.

औरंगाबादजवळील दौलताबाद भाग, नाशिक आणि पूर्ण खानदेश जिल्‍हयात या फळझाडाची थोडीफार लागवड होते. अंजीर हे कमी पाण्‍यावर येणारे काटक फळझाड आहे. अलिकडे सोलापूर-उस्‍मानाबाद येथे (अंजीराची) लागवड शेतकरी करू लागले आहेत. त्‍यावरुन अंजीर हे सर्व दुष्‍काळी भागात उत्‍तम होईल असे म्‍हणायला हरकत नाही. या अंजीर व्यापारीदृष्ट्या जसे चांगले आहे, तसेच याचा आरोग्यासाठी चांगला फायदा होत असतो.

काय आहेत अंजीर खाण्याचे फायदे....

  • अंजीरामध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे अंजीराच्या रोजच्या सेवनाने मलावस्तंभ नाहीसा होतो आणि शौचास साफ होते.
  • शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेल्या अंजीराचे दोन भागात विभाजन करून त्यामध्ये गूळ भरून ठेवावा. पहाटे ब्रह्म मुहूर्तावर चूळ भरून खावे. असे नियमितपणे सेवन केल्यास शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढतेच व उष्णताही कमी होते.

 

  • अंजीर त्वचेच्या विकारांमध्ये उत्तम कार्य करते. श्वेतकुष्ठामध्ये (पांढरे डाग) अंजीराचा नियमितपणाने आहार सेवन केल्यास फायदा होतो.
  • अंजीर पित्त विकार, रक्तविकार, वात व कफ विकार दूर करणारे आहे.
  • ताज्या अंजीरामध्ये पोषक घटक जास्त प्रमाणात असतात, तर सुक्या अंजीरामध्ये अनेक प्रकाराचे उपयोगी क्षार आणि जीवनसत्त्वे असतात.
  • कच्च्या अंजीराची जीरे, मोहरी, कोथिंबीर घालून भाजी करावी. यामुळे शरीरातील ‘अ’ जीवनसत्व व लोह यांचे प्रमाण प्राकृत राहते.
  • पिकलेल्या अंजीराचा मुरंबा करून वर्षभर खावा. हा मुरंबा दाहनाशक, पित्तनाशक आणि रक्तवर्धक असतो.
English Summary: Do you know the benefits of eating anjeer ? Read full information
Published on: 10 November 2020, 05:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)