Health

तसं बघायला गेलं तर साधारणपणे सर्वच मुलं जेवणाचा कंटाळा करताना दिसतात

Updated on 07 October, 2022 8:59 PM IST

तसं बघायला गेलं तर साधारणपणे सर्वच मुलं जेवणाचा कंटाळा करताना दिसतात त्यामुळे भुक न लागणं हा कोणताही आजार नाहीये. पण हो, भूक न लागणं हा होणा-या आजाराचा संकेत जरुर असू शकतो. त्याव्यतीरिक्त मनासारखं जेवण किंवा चटपटीत गोष्टी न मिळाल्याने मुलं जेवताना किटकिट करत राहतात. म्हणूच मुलांना वेळेत जेवायला लावणं कठीण काम असतं. काही मुलं तर जेवण्यास स्पष्ट

नकार देतात, त्यामुळे त्यांना तासनतास समजावत बसावं लागतं.They refuse, so they have to sit and explain for hours. तर काही मुलांना जेवण नाही तर मॅगी, न्युड्ल्स किंवा फास्ट फुड जास्त आवडतंं

अशी करा मोहरी, जवस लागवड आणि व्यवस्थापन

 आणि व्यव्स्थित न जेवल्याने त्यांना कमजोरी येते. त्यामुळेच जर तुमचीही मुलं जेवण्यास टाळाटाळ करत असतील तर त्यामागे काहीतरी गंभीर समस्या जन्म घेत असू शकते. न जेवल्याने शरीराला पोषक घटक किंवा जीवनसत्व न मिळाल्याने मुलं आजारी पडतात.

मुलाला आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत - मुलाला त्याच्या आवडीचे पदार्थ खाऊ घालावेत. रोजरोज एकसारखी भाजी खाऊन मुलांना कंटाळा येऊ शकतो. यासाठी वरचेवर नवीन पदार्थ मुलांना खाऊ घालावेत.मुलांच्या बाहेरच्या खाण्यावर लक्ष ठेवावे - अनेकदा लहान मुले ही दिवसभरात चॉकलेट, बिस्किटे, केक, स्नॅक्स, चिप्स, फरसाण वैगरे पदार्थ खात असतात. त्यामुळे अशा पदार्थांनी आधीच पोट भरल्यामुळे

जेवताना भूक लागत नाही. अशावेळी ते जेवण खाण्यास कंटाळा करतात. त्यामुळे लहान मूल दिवसभरात काय खातात याकडेही लक्ष द्यावे. मुलाला जेवताना भूक लागत नसल्यास काही दिवस त्याला फास्टफूड,बिस्किटे, चॉकलेट, स्नॅक्स असे पदार्थ देणे टाळावे.मुलाला बाहेर खेळण्यास पाठवावे - मैदानी खेळ खेळण्यामुळे मुलाचा व्यायाम होतो व खाल्लेल्या आहाराचे योग्यप्रकारे पचन होण्यास मदत होते.

त्यामुळे खेळून- पळुन आल्यावर मुलाला चांगलीच भूक लागते ! त्यामुळे मुलाच्या व्यायामाकडे लक्ष द्यावे. सकाळी व संध्याकाळी त्याला फिरण्यास घेऊन जावे, मैदानी खेळ, दोरीउड्या, पळणे, सायकल चालवणे असे व्यायाम मुलाला करू द्यावेत.लहान मुलांच्या भूक वाढीसाठी औषधे: लहान मुलाची भूक वाढवण्यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्याने टॉनिक देता येईल. मुलाचे वय 6 वर्षापेक्षा जास्त

असल्यास आयुर्वेदिक औषधही भूक वाढवण्यासाठी देता येऊ शकतात.मुलाला भूक लागत नसल्यास डॉक्टरांकडे कधी जावे ?हुतेकवेळा लहान मुलांना भूक न लागणे हे फारसे चिंताजनक बाब नसते. मात्र मुलाची भूक कमी होण्याबरोबरच जर त्याचे वजनही कमी होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते.

 

संकलन-निसर्ग उपचार तज्ञ

डॉ. प्रमोद ढेरे, पिंपरी-चिंचवड, पुणे. 

आरोग्यविषयक व्याख्याते व लेखक

संपर्क - ९२ ७१ ६६९ ६६९

English Summary: Do this remedy to increase the appetite of children
Published on: 07 October 2022, 08:21 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)