आपल्या मेंदूमध्ये हिपोकॅम्पस(Hippocampus) ये एक स्मरणशक्तीचे सेंटर असते. या सेंटर मधेच स्मरणशक्ती साठीच्या पेशी(Brain Cells) तयार होत असतात.या पेशी जर योग्य प्रमाणात तयार झाल्या तर स्मरणशक्ती चांगल्या प्रमाणात वाढू शकते असे शास्त्रज्ञांचे मत आहे.आणि हे करण्यासाठी कुठल्या महागड्या औषधांची गरज नसून खालील काही गोष्टी केल्या तर सहजरित्या स्मरणशक्ती वाढू शकते असे काही प्रयोगांवरून सिद्ध झाले आहे.
1.योग्य आहार: कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली, बदाम, अक्रोड हे खाल्ल्याने स्मरणशक्ती तेज राहते.Eating cauliflower, broccoli, almonds, walnuts keeps memory sharp. या पदार्थांमध्ये अँटीऑक्सिडंट्स जास्त असतात ते खाल्ल्याने मेंदूचे आरोग्य चांगले राहते तसेच नवीन ब्रेन सेल्स तयार करण्यास हे पदार्थ प्रेरक देखील ठरू शकतात.2.व्यायाम:व्यायाम केल्याने मेंदू त्याच्या सर्वोत्तम क्षमतेने काम करतो. नर्व्ह सेल्स देखील व्यायामाने कार्यरत होतात. व्यायाम केल्याने नर्व्ह सेल्स एक प्रोटीन तयार करते जे मज्जासंस्थेचे आरोग्य नीट ठेवते.
3.एका वेळेस एकच काम करा:माणसाचा मेंदू हा एका वेळेस एकच काम करू शकतो. शोधांतून असे सिद्ध झाले आहे कि मेंदूला एखादी गोष्ट मेमरी मध्ये स्टोर करण्यासाठी 8 सेकंड्स लागतात. म्हणजेच जर तुम्ही एकच वेळेस फोन वर बोलत असाल आणि एखादी पिशवी घेऊन जात असाल अशा वेळेस जर तुम्ही गाडीची चावी एखाद्या ठिकाणी ठेवली तर ते तुम्हाला आठवण्याचे चान्सेस खूप कमी असतात. तरीही जास्तीत जास्त 3-5 गोष्टी तुम्ही एका वेळी करू शकता पण यातून खूप स्ट्रेस येऊन ब्रेन सेल्स साठी हे धोक्याचे असते. म्हणून चांगल्या
स्मरणशक्तीसाठी एका वेळी एकाच कामावर फोकस करा.4.झोप:भरपूर झोप घेणे हे देखील स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करते. नवीन, क्रिएटिव्ह गोष्टी सुचण्यासाठी योग्य झोप घेणे गरजेचे आहे.5.ब्रेन गेम्स:फोन मधील ब्रेन कॅटेगरी मधल्या गेम्स खेळून देखील मेंदूला चालना मिळू शकते.6.नवीन गोष्टी शिका:एकच गोष्टीवर कायम काम करत राहिल्यास मेंदूच्या सेल्स कायम उपयोगी येत नाहीत. म्हणून काहीतरी नवीन शिकत राहिल्यास नर्वस सिस्टिम कायम कार्यरत राहते तसेच तुमची स्ट्रेस लेवल कमी करून मेंदूला निरोगी ठेवते.
7.पाठांतर आणि शॉर्टकट्स:कुठल्याही प्रकारचे पाठांतर केल्याने मेमरी चा अधिकतम उपयोग होतो आणि मेंदू जास्त कार्यरत राहतो. म्हणूनच काही लोक ज्यांचे पाठांतर चांगले आहे त्या लोकांची स्मरणशक्ती इतरांपेक्षा जास्त असते. आपण शॉर्टकट वापरून देखील मेमरी स्ट्रॉंग करू शकतो जसे कि इंद्रदनुष्यामधले 7 रंग ध्यानात ठेवण्यासाठी " जातानाही पाणी पि" हा शॉर्टकट आपण वापरू शकतो( जांभळा, तांबडा, नारंगी, हिरवा, पारवा, निळा आणि पिवळा) तसेच यमक असणाऱ्या कविताही आपल्या लवकर ध्यानात राहतात.
Published on: 26 August 2022, 11:10 IST