Health

तुम्हांला तुमचा दिवस छान आणि आनंददायी जाण्यासाठी सकाळी-सकाळी काय हवे असते

Updated on 28 August, 2022 7:09 PM IST

तुम्हांला तुमचा दिवस छान आणि आनंददायी जाण्यासाठी सकाळी-सकाळी काय हवे असते तर एक परिपूर्ण नाश्ता हवा असतो. रात्रभराच्या विश्रांतीनंतर तुमच्या अवयवांना लागणारी ऊर्जा पुरवण्यासाठी या नाश्त्याची गरज असते. तसेच नाश्ता हा दिवसभरातील आहारापैकी महत्वाचा आहार असतो.त्यामुळे सकाळी उठल्यावर अनशापोटी म्हणजेच रिकाम्यापोटी काय खावे काय खाऊ नये याची काळजी घेणे आवश्यक असते. जर सकाळी रिकाम्या पोटी जर काही चुकीच्या पदार्थांचे

सेवन केले तर त्यामुळे आरोग्यविषयक आणि पोटविषयक विविध समस्या निर्माण होतात. या निर्माण होऊ नये म्हणून रिकाम्या पोटी कोणते पदार्थ खाऊ नये याची काही माहिती आम्ही देणार आहोत.मसलेदार आणि तिखट पदार्थ - प्रत्येकाला मसालेदार आणि चटपटीत पदार्थ हे आवडत असतात.Everyone loves spicy and spicy food. परंतु जर तुम्हांला पचनविषयक पोटविषयक काही समस्या नको असतील तर, प्रत्येकाने हे मसालेदार चटपटीत पदार्थ हे सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी खाणे टाळणे अवश्यक

असते. मसालेदार आणि तिखट पदार्थ तुमच्या आतड्यांसाठी हानिकारक असतात. तसेच ते पोटात हानिकारक अम्लाची निर्मिती करतात आणि त्यामुळे तुम्हांला ऍसिडीटी किंवा गॅस्टिक अल्सर सारख्या समस्या निर्माण करतात.साखरयुक्त पदार्थ आणि पेय - गोड पदार्थ कोणला आवडत नाही, पण सकाळी-सकाळी रिकाम्या पोटी जर तुम्ही अति प्रमाणत गोड पदार्थ किंवा पेये याचे सेवन केले तर तुमच्या रक्तातील साखर वाढेल आणि यामुळे तुमच्या यकृतावर आणि स्वादुपिंडावर दबाब येऊन त्यांच्या कार्यामध्ये समस्या निर्माण होण्याची

शक्यता असते आणि दररोजचे अति साखरयुक्त पेये आणि पदार्थाचे रिकाम्या पोटी सेवनामुळे भविष्यात मधुमेह होण्याची शक्यता असते.आंबट फळे - तुम्हाला वाटत असेल फळे तर सगळ्यात आरोग्यदायी आहार आहे, हो हे खरे असले तरी आंबट फळे म्हणजेच सायट्रिक असलेली फळे रिकाम्य पॉट खाल्याने पोटात ऍसिडीचे प्रमाण वाढवण्याची शक्यता असते. तसेच टोमॅटो सारख्या भाज्या देखील रिकाम्य पोटी खाणे टाळावे याने ऍसिडिटी किंवा गॅसेससंबधी समस्या वाढण्याची शक्यता असत.

हिरव्या कच्च्या भाज्या हो! हिरव्या किंवा कच्च्या भाज्या या खुप आरोग्यदायी असल्यातरी सकाळी रिकाम्या पोटी खाणे हे हानिकारक ठरू शकते.ज्यावेळी तुम्ही सकाळी उठता त्यावेळी तुमची शरीरातील अंतर्गत व्यवस्था कार्यरत झालेली नसते त्यामुळे सकाळी सकाळी-कच्च्या भाज्या पचवणे हे पोटाला जड जाते आणि त्यामुळे पॉट डब्बा होणे पॉट दुखणे असे त्रास होण्याची शक्यता असते.दही आणि आंबवलेले पदार्थ - दही आणि इतर आंबवलेल्या ही आणि इतर आंबलेल्या पदार्थांमध्ये

चांगले जीवाणू असतात यांची पचनाला मदत होते. पण जेव्हा ते रिकाम्या पोटी घेतले जातात तेव्हा हे अन्न पदार्थ हायड्रोक्लोरिक ऍसिड बनवतात, ज्यामध्ये निसर्गात अत्यंत आम्ल असते. आणि यामुळे तुम्हांला अत्यंत तीव्र प्रकारची ऍसिडिटी होण्याची शक्यता असते.कॉफी - उठल्या-उठल्या बरेचजण स्ट्रॉग कॉफी पितात. कॉफीमुळे जरी तुम्हांला फ्रेश आणि ताजे-तवाने वाटत असेल तरी रिकाम्या पोटी कॉफी पिणे हे आम्लपित्त वाढवू शकते तसेच यामुळे छातीत जळ-

जळ होणे गॅसेस होणे या समस्या निर्माण होतात.कॉफी गोड पदार्थ यांच्या शिवाय सकाळ कशी सुरू होणार…त्यावेळी त्या त्या गोष्टी छान वाटतील पण त्याचे भविष्यात गंभीर परिणाम होण्याची शक्यता असते त्यामुळं काळजी घेणं कधीही चांगले.. बरोबर ना ?या माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही समुहात आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू!

 

संकलन: नितीन जाधव  

स्रोत:- सौंदर्य उपचार

९१९०८२५५६६९४

English Summary: Do anything but do not eat these foods in the morning on an empty stomach, because you will read what will happen
Published on: 28 August 2022, 07:09 IST