आपल्याला माहित आहे की शरीर निरोगी राहण्यासाठी हिरव्या पालेभाज्याआणि फळे यांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. परंतु आपण कधीही एखाद्याला गडदपदार्था बद्दल सांगताना ऐकले आहे का? तर याचे उत्तर कदाचित नाही असेच आहे. कारण आपला सर्वांचा असा गैरसमज आहे जे काही तरी काळ्यारंगाच्या असेल तर ते काहीतरी विचित्र आहे.खाण्यास योग्य नाही.
.या बाबतीत तज्ज्ञ म्हणतात की काळ्या रंगाची फळे किंवा भाज्या त्यांच्या आहारात समाविष्ट करणे आवश्यक आहे.
जर आपण पाहायला गेले तर गडद रंगाचे पदार्थ लोकांना खूप आकर्षित करतात.संशोधनात असे दिसून आले आहे की त्यामध्ये उपस्थित अँथोसायनिन आपल्याला मधुमेह, कर्करोग आणि हृदयविकाराच्या झटका सारखे आजारांशी लढायला देखील मदत करू शकते. या लेखात आपण अशा पाच गडद रंगाच्या पोषक आराम बद्दल माहिती घेणार आहोत जे खाणे आवश्यक आहे.
- निरोगी आरोग्यासाठी उपयुक्त ब्लॅकबेरी-जेव्हा आरोग्याबाबत बोलले जाते तेव्हा ब्लॅकबेरीशरीरासाठी फायदेशीरच समजले जातात. लागीर याचे नियमित सेवन केल्याने शरीरातील सूज कमी होण्यास मदत होते.शिवाय रोगप्रतिकारक शक्ती सुद्धा चांगली होते. या फळाचे महिलांनी सेवन करणे गरजेचे आहे. मासिक पाळी अनियमित असेल तर या फळाच्या सेवनाने मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते.या फळात अँटिऑक्सिडंट मोठ्या प्रमाणात असतात.
- एंटीऑक्सीडेंट युक्त काळी द्राक्षे-काळ्या द्राक्षामध्ये हिरव्या किंवा लाल द्राक्ष पेक्षा जास्तएंटीऑक्सीडेंट असतात. ते रासायनिक मिश्रण आपल्या पेशींचे नुकसान होण्यापासून संरक्षण करते.एक कर्करोग, मधुमेह, अल्झायमर, पार्किन्सन आणि हृदयरोगयासारखे आजारांपासून संरक्षण मिळते.हिरवं प्रमाणेच काळी द्राक्षे देखील आपल्याला आजारातून लवकर बरे होण्यास मदत करतात.
- काळे लसूण-काळा लसूण सहज उपलब्ध नसतो.आरोग्यासाठी त्याचे फायदे बरेच आहेत.साध्या पांढऱ्या लसुन ला उच्च तापमानात तयार केले जाते. याच्या सेवनाने जळजळ कमी करण्यास आणि स्मरणशक्ती वाढण्यास मदत होते. आला असून विशेषतः अल्झायमर च्या रुग्णांसाठी वरदान आहे.
- काळे तीळ- काळे तीळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे.काळे तीळ मध्ये सॅच्युरेटेड फॅट्स, मोनो अनसॅचुरेटेड फॅट, कॅल्शियम आणि मॅग्नेशियम समृद्ध असलेले काळे तीळ हृदय व रक्तवाहिन्यांच्या संबंधी आरोग्य आणि उच्च रक्तदाबाचा सारख्या समस्यांसाठी चांगला घरगुती उपाय आहे. यामध्ये असलेले लोह,तांबे आणि मॅगनीज ऑक्सिजनचा प्रवाहआणि रक्ताभिसरण नियंत्रित करतात.
- काळे अंजीर- काळे अंजिरा बद्दल आपल्याला फारच कमी माहिती आहे. काळे अंजीर मधुर, चवदार आणि ताजी फळे असतात जी अमेरिकेतपिकतात. पोटॅशियम आणि फायबर समृद्ध असल्याने हे फळ पचन शक्ती सुधारते.
- तसे आपण अंजीर खाऊन वजन कमी करू शकतात.काळे अंजिरा मध्ये असलेले विशेष घटक कर्करोगाच्या पेशी विरुद्ध लढायला मदत करतात. तसेच रक्तदाब कमी करण्याबरोबरच त्यांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाचा समस्येपासून मुक्तता मिळते.
- काळे तांदूळ- काळे तांदूळ इतर धान्य पेक्षा जास्त पौष्टिक असतात.या तांदळाचा काळा रंग तुम्हाला कदाचित आवडत नसेल पण स्वतःला निरोगी ठेवण्यासाठी त्यांचे सेवन करणे चांगले मानले जाते. पोटाशी संबंधित आजार बरे करण्यासाठी चीनमधील बहुतेक लोक याचे सेवन करतात.काळ्यातांदळामध्ये अँटिऑक्सिडंट असतात. जे दृष्टी सुधारण्यासाठी चांगले असतात. मधुमेह आणि कर्करोगाच्या रुग्णांसाठी हा भात अत्यंत उपयुक्त असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.(संदर्भ-लोकमत)
टीप- कुठलाही औषधोपचार करणे अगोदर डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.
Published on: 21 December 2021, 02:06 IST