Health

आपल्या आहारात आपन काही गोष्टींना महत्त्व देतो त्या मधली एक आहे लिंबू

Updated on 28 May, 2022 2:28 PM IST

लिंबूवर्गीय फळझाडांच्या लागवडीबाबत महाराष्ट्राचा भारतातून सर्वात पहिला नंबर लागतो. लिंबूवर्गीय फळझाडामध्ये मोसंबी संत्री व लिंबु यांचा समावेश होतो. सद्याच्या हंगामामध्ये मोठ्या प्रमाणात लिंबुचे उत्पादन येत असून त्यामध्ये कागदी लिंबामध्ये विशेष औषधी गुणधर्म आहेत. लिंबुच्या झाडाला चार वर्षापासून फळे येणे सुरु होतात, त्यामध्ये जास्त उत्पादन देणाऱ्या साईसरबती, फुले सरबती ह्या जाती महात्मा फुले कृषि विद्यापीठाने विकसीत केलेल्या आहेत.आरोग्याच्या दृष्टीकोनातून फळांवरील प्रक्रिया व महत्व जुलै ते सप्टेंबर व सद्याच्या काळातील डिसेंबर ते जानेवारी या कालावधीत मोठ्या प्रमाणात फळांचे उत्पादन होते, परंतु उत्पादनाच्या तुलनेत मालाला मिळणारी किंमत अत्यल्प असल्याने ते विक्री केली असता शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानाला तोंड द्यावे लागते. अशावेळेस शेतकऱ्यांची निराशा टाळण्यासाठी लिंबूवर प्रक्रिया करणे आवश्यक झाले आहे.

लिंबाचे ओषधीयुक्त गुणधर्म१) लिंबु हे पाचक, नेत्र सतेज करणारे, उत्साहवर्धक, रुचकर व वायु हारक आहे. शे उल्टी, कंठरोग, कॉलरा, आमवात, रक्तपात व कृमींचा नाश करणारे आहे. ३) मलेरिया, कॉलरा, घटसर्प, टायफाईड, निमोनिया, फ्ल्यू तसेच स्वाईन फ्ल्यू सारख्या रोगांवरगुणकारी४) ५) वनस्पतीजन्य विष पोटात गेल्यास गेल्यास लिंबुचा रस गुणकारी आहे. लिबाच्या रसात जंतुनाशकता व रोग प्रतिकारकता वाढविण्याची क्षमता असल्याने पावसाळ्यात नेहमी वापर करावा. "लिंबातील विपुल क जीवनसत्वामुळे रक्तपित्तावर नियंत्रण आणते, शरीराच्या आंतरभागातील होणारा रक्तस्त्राव थांबविण्यासाठी लिबुरस गुणकारी आहे. (७)८) केसातील कोंडा व केस गळती थांबविण्यासाठी तसेच चेहरा व शरीरच्या आंतरबाद्य स्वच्छतेसाठी लिंबुव आवळा मिश्रण उत्कृष्ट आहे.९) डोळयाची दृष्टी सुधारुन डोळयात पाणी येणे कमी करते व खुपन्यासारखे आजार बरे करते. 90) दाताच्या व हाडाच्या मजबुतीसाठी व संधीवातावर लिबुरस गुणकारी आहे. ११) दाढेची सुज, घसा व तोंडाच्या विकारावर तसेच स्कव्ही सारख्या आजारावर लिंबुरस गुणकारी आहे,

(१२) लिंबू रस अपचन व हृदयातील घडधड व उच्च रक्तदाब कमी करणारे आहे.(१३) मुत्रपिंड व मुत्राक्षयाच्या व यकृताच्या विकारांवर लिंबू रस गुणकारी आहे. १४) मधे व लिंबाच्या रसाने बध्दकोष्ठता दूर होते. (१५) स्थूलपणा दूर करण्यासाठी लिंबु मध पाणी नियमितपणे घेतल्यास फायदा होतो.वरील फायदा होण्यासाठी लिंबुपासुन खालीलप्रकारचे टिकावु पदार्थ तयार केल्यास हंगामाशिवायही वर्षभर पदार्थाचा आहारात समावेश करण्यासाठी खालील विविध पदार्थ तयार करुन वर्षभर त्याची विक्री करणे सहज व सोपे होवु शकते.१) लिंबू सरबत :साहित्य : रसाळ लिबु१००/५०, रसाच्या दिडपट साखर कृती: लिंबुचा रस काढून घ्या, त्यातील बिया काढून टाका, रस कपाने मोजुन घ्या. त्याच्या दिडपट साखर घालून आचेवर ठेवा व ढवळत रहा, साखरेचा पाक झाल्यावर आचेवरुन उतरवुन नैसर्गिक सुगंधासाठी लिंबाच्या पिवळ्या सालीचा बारीक किस घाला व गरम गरम रस निर्जंतुक बाटल्यांमध्ये भरा.२) आले लिंबू सरबत :साहित्य : आले १०० ग्रॅम. लिंबु ६. साखर २५० ग्रॅम, पाणी २५० मिली कृती : आले किसुन स्वच्छ पाट्यावर वाटून गोळा करा. लिंबाचा रस काढा, आल्याचा गोळा पाणी मंद आचेवर ५ ते ७ मिनिटे उकळवा.

नंतर त्या पाण्यात साखर घालून कोवळा पाक करा, पाक असतांनाच गाळा व त्यात लिंबाचा रस घाला. थंड आल्यावर बाटलीत भरून ठेवा.Squash स्काॅश (ह्यामध्ये ४५ ते ५० टक्के साखर आहे)१ लिटर फळाचा रस (१०० लिंबू)२कीलो साखर १ लिटर पाणी पोटॅशिअम मेटाबायसल्फाईड अर्धा चम्मच (३ ग्रॅम) (सोडीयम बेझोंयेट फळांना चांगले स्वच्छ धुवून साफ करून रस काढावा. लिटरच्या मापाने मोजुन वेगळा रसानुसार साखर व पाणी घ्यावे, त्याचा पाक करायला ठेवावा. साखर विरघळल्यानंतर चाचणी कपड्यांनी गाळून घ्यावी. गाळल्यावर त्या पाकाला थंड करावा व त्यामध्ये थंड पाकात फ मिसळावा व सोडीयम बेझोनेट मिसळून तयार रसामध्ये टाकावे व ताबडतोब बॉटलमध्ये १ इंच भरावे.,लोणचे प्रकार : ,लिंबाच्या फोडी १.५ किलो,मेथी २० ग्रॅम,हिंग पावडर ५० ग्रॅम,हळद पूड ३० ग्रॅम लाल तिखट ५० ग्रॅम मोहरी पावडर १० ग्रॅम मीठ २५० ग्रॅम गोडे तेल १५० ग्रॅम १) आठ फोडी करुन त्यात अर्धे मीठ व हळद, तिखट पूर्ण चोळून ठेवावे २२ दुसऱ्या लहान पातेल्यात फोडणी पुरते तेल काढून बाकीचे तेल गरम करुन थंड होण्यास ठेवावे.लहान पातेल्यातील तेल गरम करून त्यात मेथी, हिंग, मोहरीची पूड टाकुन प फोडणी थंड झाल्यावर फोडींवर ओतावी.शिल्लक राहीलेले मीठ टाकुन एकजीव करावे. मिश्रण मोठ्या तोंडाच्या बरणीत थंड झालेले तेल ओतावे. बरणी हाताने हलवून आतील संपूर्ण हवा बाहेर जाईल घेवून झाकण लावावे.

लोणचे प्रकार : लिंबु २५,साखर १.५ किलो,लाल तिखट अर्धी वाटी मीठ पाकाकरीता ३ वाट्या पाणी,१०० ग्रॅम आले,५० ग्रॅम मनुका, फोडीत मीठ लावून आठ दिवस भरणीत भरून ठेवावे. भरणीत भरल्यानंतर दिवसातुन एकदा व्यवस्थीत हलवावे लिंबाचा उग्रवास व कडूसर चच जाते आठ दिवसांनंतर साखरेचा तीन तारी पाक करावा.मीठ लावलेल्या फोडी गरम पाकात घालुन अकडी आणाची  तिखट, खारकेचे तुकडे, आल्याचे काप, मनुका घालुन लोणचे एकजीव करुन रुंद तोंडाच्या भरणीत मरुन ठेवावे लोणचे प्रकार : ३ लिंबु १ किलो (२० ते २५ नग) गुळ अर्धा किलो तेल ५ ग्रॅम मीठ २५० ग्रॅम हिंग ५ ग्रॅम सोप पावडर १५ ग्रॅम धने पावडर १५ ग्रॅम मेथी पुड चहाचा अर्धा चम्मच हळद ५ ग्रॅम तिखट ५० ग्रॅम लोणचे मसाला २० ग्रॅम लिंबुच्या फोडी करुन किलोला १५० ग्रॅम मीठ घालणे, मिक्स करुन एका बरणीत मुरु दयावे व १५ ते १ महिना नंतर १ पातेल्यात थोडे तेल टाकुन मोहरी टाकावी. हिंग टाकावा, मेथीपुड टाकावी गॅसवर ठेवून बाकी सर्व मसाले एकदम टाकुन दयावे आणि गुळ बारीक करुन टाकावा, गरम लोणच्यामध्ये गुळ टाकावा व मिक्स करुन बरणीत भरून ठेवावा.ही सर्व माहीती प्रशिक्षण अंतर्गत घेतली आहे.

 

डॉ. सौ. प्रणिता जि. कडू (काकडे) विषय विशेषज्ञ (गृहविज्ञान), कृषि विज्ञान केंद्र, घातखेड, अमरावती१

Save the soil all together

माहीती संकलण

मिलिंद जि गोदे

Save the soil all together

milindgode111@gmail.com

English Summary: Dietary importance and properties of lemon and make it a sustainable food
Published on: 28 May 2022, 02:28 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)