Health

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्या व्यक्तीला खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण काहीही अनहेल्दी खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यासाठी तुम्हाला एक चांगले फळ सुचवणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने साखर कमी होण्यास मदत होईल.

Updated on 24 September, 2022 5:30 PM IST

जर एखाद्या व्यक्तीला मधुमेह असेल तर त्या व्यक्तीला खाण्यापिण्याची खूप काळजी घ्यावी लागते. कारण काहीही रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. यासाठी तुम्हाला एक चांगले फळ सुचवणार आहोत, ज्याचे सेवन केल्याने साखर (sugar) कमी होण्यास मदत होईल.

डाळिंबाचे सेवन साखरेच्या रुग्णांसाठी खूप फायदेशीर आहे. अँटिऑक्सिडंट (Antioxidant) गुणधर्मानी समृद्ध, डाळिंबात ग्रीन टी आणि रेड वाईनपेक्षा जवळजवळ तिप्पट अँटीऑक्सिडेंट असतात, जे मधुमेहामुळे होणार्‍या नुकसानाशी लढण्यास मदत करतात.

डाळिंबात कार्बोहायड्रेट्सचे प्रमाणही कमी असते, कारण कार्बोहायड्रेट्सचे (Carbohydrates) चयापचय लवकर होते, ज्यामुळे ब्लड शुगर वाढते. मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहारात कमी कार्बोहायड्रेटयुक्त पदार्थांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो.

मधुमेह हा खराब जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयींमुळे होणारा आजार असून, आहारावर नियंत्रण ठेवल्यास हा आजार बर्‍याच अंशी आटोक्यात ठेवता येतो. मधुमेहाच्या रुग्णांना रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवायचे असेल तर डाळिंबाचे सेवन करावे.

पीएनबी किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांना मिळणार 50 हजार रुपये; असा करा अर्ज

शुगरच्या रुग्णांसाठी डाळिंबाचे फायदे

1) अँटी-इमफ्लेमेटरी गुणधर्म असलेले अँटिऑक्सिडंट असतात, जे हाय ब्लड शुगरची लक्षणे जसे की थकवा, स्नायू दुखणे कमी करतात.
2) या फळामध्ये कमी ग्लायसेमिक इंडेक्स आणि ग्लायसेमिक लोड आहे ज्यामुळे हाय ब्लड शुगर रुग्णांना मदत होते.
3) डाळिंब शरीरातील इन्सुलिन प्रतिरोधक क्षमता कमी करण्यास देखील मदत करते.
4) या फळामध्ये असलेले फिनोलिक संयुग वजन कमी करण्यास आणि भूक नियंत्रित करण्यास मदत करतात.

पोस्ट ऑफिसच्या मासिक उत्पन्न योजनेत एकदाच रक्कम जमा करा आणि दरमहा मिळवा पेन्शन

शुगरच्या रुग्णांनी डाळिंबाचे सेवन असे करावे

हाय ब्लड शुगर असलेले रुग्ण थेट फळ म्हणून डाळिंब खाऊ शकतात. पण जर तुम्ही डाळिंब खाण्यासाठी काही नवीन मार्ग शोधत असाल तर तुम्ही या दोन प्रकारे डाळिंब खाऊ शकता. सलाड किंवा फ्रूट सलाडमध्ये डाळिंब वापरू शकता. डाळिंबाचे दाणे काढून सलाडमध्ये टाकल्यास डाळिंबाची चव वाढते. आवडता सुकामेवा, बिया, डाळिंबाचे दाणे आणि इतर फळांसह स्वादिष्ट स्मूदीच्या स्वरूपात डाळिंबाचे सेवन करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
पाऊस पुढचे काही दिवस विश्रांती घेणार; मका, बाजरी, भुईमूग, सोयाबीन पिकांचे करा असे नियोजन
आधार शिला योजनेत फक्त 29 रुपये गुंतवा आणि मिळवा 4 लाख रुपयांचा नफा
पीक विम्याबाबत कृषी विभागाकडून महत्वाचे आवाहन; शेतकऱ्यांनो लवकरात लवकर करा हे काम

English Summary: Diabetic patients should consume fruit sugar control benefits
Published on: 24 September 2022, 05:25 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)