जर तुम्हाला सुंदर आणि चमकदार त्वचा पाहिजे असेलतर दररोज किमान एक वाटी द्राक्ष खाण्याची सवय लावा. द्राक्ष प्रामुख्याने त्वचा आणि केसांसाठी खूप फायदेशीर आहेत. कारण द्राक्ष खाल्ल्याने शरीरात ऑक्सिडेशनची प्रक्रिया मंदावते. द्राक्षामध्ये कॅलरी, फायबर, व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. म्हणून, द्राक्षे अधिक फायदेशीर ठरतात.
हेही वाचा : आपल्या त्वचेसाठी कडुलिंबाच्या तेलाचे अनेक फायदे आहेत
जगातील बहुतेक मृत्यू हृदयाशी संबंधित आजारांमुळे होतात. म्हणून, हृदयाशी संबंधित रोगांवर उपचार म्हणून द्राक्षे खाल्ली पाहिजेत. काही काळापूर्वी केलेल्या संशोधनात असे आढळले आहे की स्तनाच्या कर्करोगाच्या प्रतिबंधासाठी द्राक्षे खाणे खूप फायदेशीर आहे.
द्राक्षात ग्लूकोज, मॅग्नेशियम सारख्या अनेक घटक असतात. द्राक्षे अनेक रोगांवर उपयुक्त आहेत. त्याचे सेवन करणे खूप फायदेशीर आहे. प्रामुख्याने टीबी, कर्करोग आणि रक्त संसर्ग यासारख्या आजारांमध्ये फायदेशीर आहे. त्यामुळे ज्या लोकांना हे रोग आहेत त्यांनी जास्तीत-जास्त प्रमाणात द्राक्ष खाल्ले पाहिजेत.
शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यासाठी द्राक्ष फायदेशीर ठरतात. यात भरपूर प्रमाणात आयर्न असते. शरीरात रक्ताची कमतरता असल्यास एक ग्लास द्राक्षांच्या रसात २ चमचे मध घालून प्यायल्याने रक्ताची कमतरता दूर होते.
सकाळ संध्याकाळी द्राक्ष खाल्याने सांधेदुखीवर आराम मिळतो. भूक लागत नसल्यास आणि वजन वाढत नसल्यास द्राक्ष अवश्य खा. त्यामुळे भूक लागण्यास मदत होईल.
द्राक्ष खाल्यामुळे रक्त दाब नियंत्रणात राहतो. ज्यांना रक्त दाबाचा त्रास आहे, त्यांनी आठवड्यातून तीन ते चारवेळा द्राक्ष खाल्यांस त्यांना फायद्याचं ठरणार आहे.
Published on: 22 March 2021, 05:49 IST