दोन महिन्यांपूर्वी सर्व जगाचे लक्ष लागलेल्या एका शस्त्रक्रियेबाबाबत एकी धक्कादायक बातमी समोर आली आहे. यामध्ये शस्त्रक्रियेद्वारे डुकराचे हृदयरोपण करण्यात आलेल्या जगातल्या पहिल्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. यामुळे आता याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे. यामध्ये डेव्हिड बेनेट यांना हृदयविकाराचा त्रास होता. शस्त्रक्रियेद्वारे त्यांना जेनेटिकली मॉडिफाईड डुकराचे हृदय बसवण्यात आले होते. यामुळे याकडे जगाचे याकडे लक्ष लागले होते.
बेनेट यांच्यावर ही शस्त्रक्रिया केली नसती तर ते वाचू शकले नसते. त्यामुळंच युनिव्हर्सिटी ऑफ मेरीलँड मेडिकल सेंटरच्या डॉक्टरांना अमेरिकेच्या आरोग्य नियंत्रकाने ही शस्त्रक्रिया करण्याची परवानगी दिली होती. यामुळे यापुढे अशा अनेक शस्त्रक्रिया पार पडतील आणि अनेकांना यामुळे जीवदान मिळेल असे म्हटले जात होते. मात्र यावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यामुळे आता अशा शस्त्रक्रिया पार पडणार की नाही असेही म्हटले जात आहे.
या शस्त्रक्रियेनंतर तीन दिवसांनी 57 वर्षीय डेव्हिड बेनेट यांची प्रकृती सुधारत असल्याचे त्यांच्या डॉक्टरांनी सांगितले होते. हे ट्रान्सप्लान्ट माझ्यासाठी 'करा किंवा मरा' असे होते. मला माहिती आहे की, हे अंधारात बाण मारण्यासारखे आहे, पण हीच माझी अखेरची संधी आहे, असे बेनेट यांनी सर्जरीच्या आधी म्हटले होते. यामुळे काय होणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला आहे.
अमेरिकेत ही शस्त्रक्रिया पार पडली होती. पण काही दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती खालावू लागल्याचे बाल्टिमोरमधल्या त्यांच्या डॉक्टर्सनी सांगितले. या शस्त्रक्रियेतले धोके बेनेट यांना माहिती होते. 10 जानेवारी 2022 रोजी जगामध्ये प्रथमच अमेरिकेतील एका व्यक्तीच्या शरीरात अनुवांशिक बदल करण्यात आलेल्या डुकराचे हृदय ट्रान्सप्लान्ट करण्यात आले होते. यामुळे याकडे जगाचे लक्ष लागले होते. अमेरिका आधुनिक शस्त्रक्रियेत पुढे असते. यामुळे यामध्ये देखील यश मिळेल, असे सांगितले जात होते.
Published on: 10 March 2022, 10:21 IST