सध्याच्या काळामध्ये वजन वाढणे ही एक जटिल समस्या बनली आहे. वजन कमी करण्यासाठी लोक भरपूर प्रकारचे प्रयत्न करताना दिसतात. परंतु या लेखामध्ये आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक आहार सांगणार आहोत. जो सगळ्यांच्या घरांमध्ये बनतो. तो आहार म्हणजे आपल्या सगळ्यांच्या किचन मध्ये बनणारा डाळभात.
डाळ भात वजन कमी करण्यासाठी उपयुक्त:
बहुतेक लोकांचा असा गैरसमज आहे की डाळ भाताचा सेवन केल्याने वजन वाढते. डाळ भात हे साधे जेवण आहे जे सगळ्यांच्या घरात तयार होते. डाळ भात खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. डाळ भात वजन कमी करण्यासाठी लाभदायक सिद्ध होते.डाळीमध्ये प्रोटीन आणि फायबर भरपूर प्रमाणात असते आणि तांदूळ मध्ये कार्बोहायड्रेट असते. जेव्हा तुम्ही डाळ आणि तांदूळ सोबत खातात तेव्हा शरीराला कार्बोहायड्रेट सोबतच लागणारी महत्त्वाची विटामिन्स मिळतात.
हेही वाचा:ड्रॅगन फ्रुटचे आरोग्यदायी फायदे
त्यामुळे शरीरात ऊर्जा तयार होते. आणि पचन व्यवस्था ठीक राहते. जर तुम्ही हप्त्यात चार वेळा आहारात डाळभात सेवन केले तर वजन न वाढता ते घटते.
डाळ भात खाण्याचे फायदे:
- डाळ आणि तांदळाचे कॉम्बिनेशन वजन घटवण्यासाठी चांगला पर्याय मानला जातो. यामध्ये प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि फायबर भरपूर असते. त्यामुळे कुठल्याही साईड इफेक्ट नव्हता वजन घटते
- व्हेजिटेरियन लोकांसाठी डाळभात हा प्रोटीन चा महत्त्वाचा स्त्रोत आहे. डाळभात खाण्याने वजन घटते एवढेच नाही तर अन्य आरोग्यविषयक समस्याही कमी होतात.
हेही वाचा:ज्वारीच्या भाकरीचे आहारातील महत्व
- डाळ भात मध्ये फायबर मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे पोटाचे समस्या होत नाही.
Published on: 27 January 2021, 11:36 IST