किडनी हा आपल्या शरीराचा महत्त्वाचा भाग आहे. शरीरात कोणत्याही प्रकारचा संसर्ग झाला तर त्याचा पहिला परिणाम आपल्या किडणीवर होतो. जर एखाद्या व्यक्तीला आधीच संसर्ग तसेच हाय ब्लडप्रेशर असेल तर त्याने त्याच्या आहाराची व्यवस्थित प्रकारे काळजी घेणे खूप महत्वाचे आहे. प्रत्येक गोष्ट हेल्दी म्हणून खाऊ नका कारण ते किडनीला हानी पोहोचवू शकते.
१. संत्र्याचा रस:-
खुप प्रमाणात लोक संत्र्याचा रस पीत आहेत कारण त्यामध्ये व्हिटॅमिन-सी चांगल्या प्रमाणात असते ज्यामुळे रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. एक कप संत्र्याच्या रसामध्ये सुमारे 473 मिलीग्राम पोटॅशियम असते, जे खूप जास्त असते, त्यामुळे किडनीच्या रुग्णांना व्हिटॅमिन-सी साठी दुसरा कोणताही पर्याय निवडा मात्र संत्रा खाऊ नका.
२. टोमॅटो :-
टोमॅटो खाणे देखील तुमच्यासाठी चांगले नाही. कारण एक कप टोमॅटो सॉसमध्ये सुमारे 900 मिलीग्राम पोटॅशियम असते. इतकं पोटॅशियम तुमच्या शरीरात गेल्यास किडनी स्टोन होण्याची शक्यता खूप जास्त असते, त्यामुळे तुम्ही कोणत्याही डिशमध्ये सॉस घेत असाल तर चिली सॉस घ्या पण ताटात टोमॅटो सॉस घेऊ नका.
३. लोणचे :-
उन्हाळ्यात लोणचे खाणे खूप लोकांना आवडते. मात्र वृद्ध लोक लोणच्याशिवाय अन्न खात नाहीत परंतु जर तुम्हाला किडनीचा त्रास असेल तर तुम्हाला लोणच्या खाण्यावर नियंत्रण ठेवावे लागेल. लोणच्यामध्ये भरपूर प्रमाणात मीठ असते. किडनीच्या रूग्णांसाठी सोडियम जास्त प्रमाणात घेणे अजिबात चांगले नाही.
४. ब्राउन तांदूळ :-
आजकाल अनेक घरांमध्ये पांढऱ्या तांदळाऐवजी ब्राऊन राईस वापरला जातो. ब्राउन राईस ते लोक खातात ज्यांना वजन कमी करायचे आहे परंतु ब्राउन राइस किडनीच्या रुग्णांसाठी चांगली गोष्ट नाही. पांढऱ्या तांदळाच्या तुलनेत ब्राऊन राईसमध्ये दुप्पट पोटॅशियम आणि फॉस्फरस असते, जे किडनीच्या रुग्णांच्या आरोग्यासाठी हानिकारक आहे.
५. पालक :-
पालक भाजीचे सेवन आरोग्यासाठी खूप चांगले मानले जाते मात्र किडनी स्टोन असलेल्या रुग्णांसाठी ते चांगले नाही. पालकामध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते, तसेच त्यात ऑक्सलेट देखील आढळतात, ज्यामुळे दगड तयार होतात. पालक नीट शिजवूनही त्यात पोटॅशियम कमी होत नाही. जे की हे किडनी स्टोन असलेल्या लोकांच्या आरोग्यासाठी खूप धोकादायक आहे.
Published on: 02 October 2022, 09:31 IST