Health

दिसायला लहान असणारे जिऱ्याचे आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप फायदे आहेत.जिऱ्याचा फायद्यांची यादी बरीच मोठी आहे.

Updated on 19 May, 2022 5:18 PM IST

आपल्याला अनेक चवदार पदार्थ खायला आवडतात. आणि पदार्थांची चव वाढवण्यासाठी आपल्या स्वयंपाकघरातील मसाले कामी येत असतात.
भाजी अधिक स्वादिष्ट बनवण्यासाठी आपण अनेक मसाले वापरतो मात्र एक असा मसाल्याचा पदार्थ आहे जो प्रत्येक भाजीत टाकला जातो. ते म्हणजे जिरे.
दिसायला लहान असणारे जिऱ्याचे आपल्या आरोग्याच्या बाबतीत खूप फायदे आहेत.जिऱ्याचा फायद्यांची यादी बरीच मोठी आहे.

बघायला गेलं तर जिरे हा सर्वात जुन्या मसाल्यांपैकी एक मानला जातो. जिरे दाहक-विरोधी अँटिऑक्सिडंट्समध्ये समृद्ध आहे. याशिवाय याचे अनेक फायदे आहेत. पचन व्यवस्था सुरळीत करण्यासाठी जिरे उपयुक्त आहे. मळमळ दूर करणे तसेच सूज आणि बद्धकोष्ठता सारख्या समस्या दूर करण्यासाठी मदत करते.

प्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी जिरे महत्वपूर्ण भूमिका बजावते. स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक गोष्टीचे काही न काही महत्व असतेच. जिऱ्याचा वापर केवळ फोडणीसाठी वापर केला जातो. अनेकांचा हा समज आजच्या या लेखातून नक्कीच दूर होईल. पाहुयात या छोट्या जिऱ्याचे आश्चर्यकारक फायदे.

1.पोटासाठी जिरे आहे उपयुक्त-

जिरे पोटाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जिरे पचनक्रिया सुधारण्यास मदत करते. जिऱ्याचे पाणी तुमच्या आरोग्याला बरेच फायदे देऊ शकतात. हे कार्बोहायड्रेट्स, ग्लुकोज आणि फॅट ब्रेकिंग एन्झाईम्स सारख्या संयुगे स्रावित करण्यास मदत करते ज्यामुळे आपले चयापचय सुधारते.

सावधान ! देशात अजून कोरोना सक्रिय; एका दिवसात घावले तब्बल 'इतके' रुग्ण

2. मधुमेह रुग्णांसाठी जिरे आहे फायदेशीर -

मधुमेह असणाऱ्या रुग्णांना आपल्या आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागते. त्यांना बरेच पथ्थे पाळावे लागतात. मात्र जिऱ्याचे पाणी अशा रुग्णांसाठी वरदानच आहे. जिरे पाण्यात टाकून ते रिकाम्या पोटी पिल्याने त्याचा फायदा जास्त होतो. जिऱ्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढण्यास मदत होते. जिरे पाणी प्रभावीपणे आपले शरीर विशेषतः सकाळी स्वच्छ करते आणि हायड्रेटेडदेखील ठेवण्यास मदत करते.

3. गर्भधारणेदरम्यान पचनास उपयुक्त -

जिरे पाणी गरोदरपणात सर्वोत्तम आहे. यामुळे फुगणे, निद्रानाश आणि फुशारकी कमी होण्यास मदत करते. शिवाय, जिरे पाण्याचे गॅस-मुक्त करणारे गुणधर्म गर्भवती महिलांमध्ये ऍसिड रिफ्लक्स सुधारू शकतात. तसेच जिरे पाणी कर्बोदकांमधे आणि चरबीच्या पचनासाठी आवश्यक असलेल्या एन्झाईमसाठी उत्तेजक म्हणून काम करू शकते.

५२ हजार शेतक-यांना ४७० कोटींची कर्जमाफी, शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा

4. प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते -

जिऱ्यामध्ये पोटॅशियम आणि लोहाचे गुणधर्म मोठ्या प्रमाणात असते. त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. जिरे हे अँटिऑक्सिडेंट देखील आहे तसेच त्यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मदेखील आहेत. हे संक्रमणास कारणीभूत असलेल्या जीवाणूंशी लढण्यास मदत करते. जिऱ्यामध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम इत्यादी अनेक प्रकारची खनिजे देखील असतात.

5. त्वचेसाठी उपयुक्त -

जिरे त्वचेसाठीदेखील खूप चांगले आहे. जिऱ्याचे पाणी प्यायल्याने आपल्या त्वचेला एक चमक येते. जिऱ्यातील पोटॅशियम, कॅल्शियम, सेलेनियम, कॉपर आणि मॅंगनीजचे मुबलक प्रमाण निरोगी त्वचेसाठी जबाबदार आहे. जर तुम्ही जिरे पाण्याचा फेस पॅक हळदीसह वापरलात तर ते तुम्हाला चांगला रिझल्ट देईल.

महत्वाच्या बातम्या:
कांद्याचा वाद पुन्हा पेटला; सांगा कशी करायची शेती?

English Summary: Cumin seeds have amazing benefits
Published on: 19 May 2022, 05:18 IST