नवी दिल्ली: भारतातील कोरोना विषाणूचा (Corona virus) कहर काही थांबताना दिसत नाही. गेल्या 24 तासांत देशभरात 13 हजारांहून अधिक नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या 24 तासांत सुमारे 14 हजार लोक कोरोनापासून बरे झाले आहेत.
आरोग्य मंत्रालयाने (Ministry Health) जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 13,272 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याच वेळी, 13900 लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. देशभरात सध्या 1 लाख 1166 कोरोनाचे सक्रिय रुग्ण असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
7th Pay Commission: कर्मचारी होणार लखपती! खात्यात येणार 2.18 लाख रुपये
भारतातील काही भागात आणि जगातील काही देशात कोरोना व्हायरसची (Corona virus) प्रकरणं पुन्हा एकदा वाढू लागली आहेत. परंतु मृत्यू दर अतिशय कमी असून नियंत्रणात आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनायझेशनच्या कोविड-19 साठीच्या आपत्कालीन समितीने सांगितले की, कोरोना विषाणू अजूनही आरोग्यासाठी मोठा धोका आहे.
सर्व देशांनी त्याविरुद्धचा लढा कमजोर होऊ देऊ नये. बऱ्याच देशांनी सार्वजनिक आरोग्य (public health) आणि सामाजिक उपाय शिथिल केले आहेत. तसंच कोरोना चाचणी अर्थात टेस्टिंगमध्येही घट करण्यात आली आहे. हा विषाणू अद्यापही संपणार नसल्याचं जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांनी म्हटले आहे.
EPFO: सरकारकडून PF खातेधारकांना मोफत 7 लाख रुपये; असा घ्या लाभ...
Published on: 20 August 2022, 04:13 IST