कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत नागरिकांची मागणी जास्तीत जास्त औषधी वनस्पतींना आहे जे की मागील दीड वर्षात नागरिकांनी कोरोना ला लढा देत आहेत. तिसऱ्या लाटेत औषधी वनस्पतीना जास्तीत जास्त मागणी वाढलेली आहे. नागरिकांच्या मागणीचे स्वरूप हे नर्सरीमध्ये रोपांच्या टंचाई वरून समजते आहे. या औषधी वनस्पतीमध्ये सर्वात जास्त गुळवेल या वनस्पतीला जास्त मागणी आहे. हजारो गुळवेल ची आतापर्यंत वेगवेगळ्या नर्सरीमधून विक्री झालेली आहे. गुळवेल सोबतच तुळशी आणि काळमेघ वनस्पती ला सुद्धा मोठ्या प्रमाणात मागणी आहे. मधुमेह आजारावर गुळवेल वनस्पती नियंत्रण ठेवते. गुळवेल वनस्पतीमुळे रक्तातील साखर कमी होते तसेच आपल्या शरीरात जे पोटाचे आजर आहेत त्यापासून सुद्धा सुटका भेटते. कावीळ, रक्त कमी होणे, सांधेदुखी, अॅनिमिया आणि दमा या आजारांवर सुद्धा गुळवेल वनस्पती प्रभावी आहे.
रोगप्रतिकार शक्तीही वाढते :-
कोरोना काळात जास्तीत जास्त रोगप्रतिकारक शक्ती असणे गरजेचे होते आणि ती शक्ती गुळवेल वनस्पती पासून आपल्याला मिळते. दुसऱ्या लाटेत अचानकच नर्सरीमधून गुळवेल च्या वनस्पती ची जास्त विक्री झाल्यामुळे असे लक्षात आले की औषधी वनस्पतींना जास्तीत जास्त नागरिकांची मागणी आहे. काळमेघ ही अशी एक औषधी वनस्पती आहे ज्याने आलेला ताप कमी होतो, मलेरिया तसेच टाईफॉईड सारख्या आजारात ही वनस्पती वापरली जाते. त्वचारोग, कुष्ठरोग तसेच रक्त स्वच्छ करणे काळमेघ वनस्पती करते. काळमेघ या वनस्पती व्यतिरिक्त कडुनिंब, अश्वगंधा आणि जंगली हळद या नैसर्गिक वनस्पती सुद्धा आपल्या निरोगी जीवनसाठी महत्वाच्या आहेत.
मे महिन्यात दीड कोटींच्या गुळवेलाची मागणी :-
दिवसेंदिवस गुळवेल च्या मागणीत वाढ च होत निघाली आहे. २०२१ मधील मे महिन्यात महाराष्ट्र राज्यातील आदिवासी गटाला दीड कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचे गुळवेल वनस्पती पुरवण्याची ऑर्डर मिळाली होती. ही ऑर्डर डाबर, वैद्यनाथ तसेच हिमालय या कंपनीकडून मिळाली होती. या तीन कंपन्यांची ऑर्डर पूर्ण करण्यासाठी १ हजार ८०० पेक्षा जास्त नागरिक एकत्र येऊन दिवसरात्र काम करत आहेत.
तुळशीच्या रोपाचीही मागणी वाढली :-
गुळवेल पाठोपाठ सर्वात जास्त औषधी वनस्पतीची मागणी झाली ती म्हणजे तुळशी वनस्पती ची. तुळशी चा काढा हा चहामध्ये वापरला जातो जो की आपल्या रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी केला जातो. दरवर्षी ३० हजार तुळशीची रोपे विकली जातात असे मुंबई महापालिकेच्या एका अहवालातून सांगितले गेले आहे. मात्र कोरोनाच्या काळात ५० हजार तुळशीची रोपे विकली गेली आहेत आणि कोरोनाच्या बाबतीत सर्वात जास्त समावेश म्हणजे मुंबई शहराचा आहे.
Published on: 27 January 2022, 05:42 IST