Health

Corona Breaking: राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचे बघायला मिळत आहे. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

Updated on 05 June, 2022 3:07 PM IST

Corona Breaking: राज्यात पुन्हा एकदा कोरोना डोकं वर काढत असल्याचे बघायला मिळत आहे. आता राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांना कोरोनाची (Corona) लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

यामुळे राज्यात पुन्हा कोरोना हाताबाहेर जाईल की काय अशी भिती सर्वसामान्यांना वाटू लागली आहे. वर्तमान विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांनी आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवर ट्विट करत आपल्याला कोरोनाची लागण झाल्याची माहिती सार्वजनिक केली आहे. देवेंद्र जी यांनी ट्विट करत म्हटलं आहे की, "मला कोरोनाची लागण झाली असून मी होम कौरंटाईन मध्ये आहे."

दरम्यान गेल्या काही दिवसात आपल्या राज्यात कोरोनाचे हात पाय पसरत असल्याचे पाहायला मिळतं आहे. राज्यातील कोरोनाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता आता मायबाप शासन नागरिकांना दक्षता बाळगण्याचे आवाहन करत असून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. विशेष म्हणजे आता राजकीय लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर येऊ लागल्याने राज्यात एकच खळबळ माजली आहे.

मित्रांनो आम्ही आपल्या माहितीसाठी सांगू इच्छितो की गेल्या काही दिवसांपूर्वी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे माजी अध्यक्षा माननीय सोनियाजी गांधी यांना कोरोनाची लागण झाली होती.

याशिवाय भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे सरचिटणीस प्रियांका गांधी यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. आता राज्यात देखील कोरोनाचा शिरकाव झाला असून देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण झाली आहे. मित्रांनो हाती आलेल्या माहितीनुसार गेल्या 24 तासात 4270 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे मृतांचा आकडा गेल्या 24 तासात 15 झाला आहे. राज्यात देखील कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. राज्यात एकूण 24 हजार ऍक्टिव्ह रुग्ण असून रिकवरी रेट मात्र 98.73 एवढा समाधानकारक आहे. काल राज्यात 1357 नवीन रुग्ण सापडले असून 595 रुग्ण बरे देखील झाले आहेत. 

English Summary: Corona Breaking: Corona infiltration in Maharashtra, former CM Corona positive; The need to be careful
Published on: 05 June 2022, 03:07 IST