Health

कोथिंबीर (Coriander) शिवाय भारतीय स्वयंपाकघरात (In the Indian kitchen) एक पण भाजी बनवली जात नाही, बरोबर ना! असा एखादाच व्यक्ती असेल ज्याला कोथिंबीर आवडत नसेल. कोथिंबीरची पाने आणि पावडर स्वयंपाकघरात जवळजवळ दररोज वापरली जाते. कोथिंबीर रेस्टॉरंट (Restaurant) मध्ये भाजी गार्निश करण्यासाठी तसेच अनेक चायनीज डिशेस बनवण्यासाठी वापरली जाते. कोथिंबीर फक्त जेवणाचीच चव वाढवते असे नाही तर कोथिंबीरचे सेवन आपल्या आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असल्याचे आहारतज्ञ सांगत असतात. त्यामुळे आपण नियमित कोथिंबीरचे सेवन केले पाहिजे (Coriander should be consumed regularly). कोथिंबीर मध्ये असलेले पोषक घटक (Nutrients) आपल्या शरीरासाठी खूपच फायदेशीर असल्याचे सांगितले जाते. चला तर मग जाणून घेऊया नेमके कोथिंबिरीचे आपल्या शरीराला कुठले फायदे मिळतात.

Updated on 31 December, 2021 9:38 PM IST

दृष्टी वाढते (Eyesight increases)

कोथिंबीर मध्ये असलेले पोषक घटक मानवाची दृष्टी वाढवण्यास मदत करते. कारण कोथिंबीरमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असते जे की आपल्या डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी मदत करते. म्हणुन ज्या लोकांना नजरेचा प्रॉब्लेम असतो किंवा डोळ्याविषयी इतर काही समस्या असतात त्यांनी कोथिंबीरचे नियमित सेवन केले पाहिजे. आहारतज्ज्ञांच्या मते (According to dieticians) कोथिंबिरीचा आहारात नियमित समावेश केल्यास दृष्टी चांगली राहते आणि डोळे दुखण्याची समस्या देखील दूर होते.

मानवी शरीराला शरीराला पोषण मिळते (The human body gets nourishment )

कोथिंबीर मानवी शरीराचे पोषण करण्यासाठी विशेष भूमिका बजावते. वास्तविक, कोथिंबीरीच्या पानांमध्ये मॅग्नेशियम, कॅल्शियम, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि पोटॅशियमसारखे अनेक पोषक तत्व असतात, जे आरोग्यासाठी (For health) खूप फायदेशीर असतात. म्हणुन कोथिंबीरचे नियमित सेवन करणे आपल्या शरीरासाठी चांगले असते.

रोग प्रतिकारशक्ती वाढवते (Boosts immunity)

असे सांगितले जाते की, कोथिंबीरचे नियमित सेवन केल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती (Immunity):वाढते. हार तज्ञांच्या मते, हिरव्या कोथिंबीरमध्ये असलेले व्हिटॅमिन सी रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यास मदत करते, तसेच कोथिंबीर मध्ये असलेल्या विटामिन्समुळे आपले शरीर कोणत्याही प्रकारच्या विषाणूसोबत लढण्यास सक्षम बनते.

Disclaimer- सदर आर्टिकल मध्ये सांगितलेली माहिती, केवळ सामान्य माहिती प्रदान करते. आम्ही सांगितलेली माहिती कोणताही वैद्यकीय सल्ला नाही. आपण कुठल्याही औषध अथवा पदार्थाचे सेवन करण्याआधी नेहमी एखाद्या विशेषज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. Krishi Jagran Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही.

English Summary: coriander is helpful for boosting human immunity learn more about it
Published on: 31 December 2021, 09:38 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)