आजच्या धावपळीच्या व हायब्रीड अन्नाच्या जगात अनेकांना मधुमेहासारखे आजार होतात. मधुमेह हा आजार भारतात मोठ्या प्रमाणात वाढत आहे. या आजाराला ग्रामीण भागात साखर वाढणे असेही म्हणतात. या आजाराला अनेक गोष्टी सेवन करणे योग्य नसते त्यामुळे डॉक्टर सल्ला देतात मधुमेहाच्या रुग्णांनी त्यांच्या खाण्यापिण्याकडे अधिक लक्ष देणं आवश्यक आहे.
त्यांनी काही अयोग्य खाल्लं तर त्याचा थेट परिणाम त्यांच्या रक्तातील साखरेच्या वाढत्या पातळीवर दिसून येतो. त्यामुळे मधुमेही रूग्णांनी आपल्या आहारावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे. अशावेळी मधुमेही रूग्णांच्या मनात प्रश्न असतो की, आहारात कोणत्या भाज्यांचा समावेश करावा. तर आपन आज मधुमेह असल्यास कोणत्या भाज्या खायला हव्यात याविषयी जाणून घेणार आहोत.
कारलं
कारलं कडू असले तरी त्याच्यामध्ये अनेक जीवनसत्व असतात. कारलं खाण्याचे अनेक फायदे असतात. कारल्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी ते खूप फायदेशीर मानलं जातं. त्यामुळे या रुग्णांनी आपल्या आहारात कारल्याचा समावेश जरूर करावा. कारले खाण्याचा सल्ला कायमच डॉक्टर देतात.
भेंडी
भेंडीमध्ये कॅलरीज कमी असतात तसंच फॅटही कमी असतं. तसेच रक्तातील ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी भेंडीचं सेवन फायदेशीर ठरतं. तसंच भेंडी हे वजन कमी करण्यासाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर आहे त्यामुळे भेंडीच्या भाजीचं सेवन मधुमेहाच्या रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकतं.
ब्रोकोली
ब्रोकोलीच्या सेवनाने शरीरातील रक्तातील साखरेचं प्रमाण नियंत्रित राहण्यास मदत होते. ब्रोकोलीमध्ये सल्फोराफेन मुबलक प्रमाणात आढळतं. शरीरातील यकृताच्या पेशींमध्ये असलेलं ग्लुकोज आणि ग्लायकेटेड हिमोग्लोबीन कमी ठेवण्यासाठी हे फायदेशीर सिद्ध होतं. या भाजीत अनेक जीवनसत्व असतात ते तुम्हाला निरोगी ठेवतील.
गाजर
मधुमेहाच्या रुग्णांसाठी गाजराचे सेवन फायदेशीर मानले जाते. गाजरात भरपूर फायबर असतं. वगजर खाल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी गाजराचं सेवन करावं.
महत्वाच्या बातम्या
भावांनो यावर्षी पाऊस येणार लवकर! 20 ते 21 मेपर्यंत अंदमानमध्ये ते 30 मे पर्यंत केरळमध्ये होणार मान्सूनचे आगमन
बातमी अतिशय महत्त्वाची! तुकडाबंदीचे नियम रद्द, आता एक - दोन गुंठे जमिनीचा देखील करता येणार व्यवहार
Published on: 06 May 2022, 03:04 IST