आपण आपल्या आहारात अनेक अन्न पदार्थ आणि फळांचे सेवन करत असतो. जांभूळ खाण्यानेही आपल्याला अनेक पौष्टिक घटक मिळत असतात.
जांभळाला भारतात इंडियन ब्लॉकबेरी म्हटलं जातं. हे आयुर्वेदिक औषधासारखे असून यात अनेक औषधी गुण आहेत. विशेष म्हणजे जांभूळ हे उन्हाळ्यात येणारे फळ असून हे ऊन लागण्यापासून वाचविते. यासह या फळाचे अनेक औषधी गुण आहेत. या फळातून व्हिटॉमीन ए, व्हिटॉमीन सी, कॅल्शिअम, आयरन, फायबर, मॅग्नेशिअम, प्रोटीन, आणि कार्बोहायड्रेट्स मिळत असतात. जर आपल्याला तोंड येण्याची समस्या असेल तर तुमच्यासाठी हे फळ खूप फायदेशीर आहे. पण तुम्हाला माहिती आहे का, या फळासह याच्या बियाही खूप फायदेकारक आहेत. पण अनेकजण या बिया फेकून देत असतात. अनेक विकारांवर जांभळाच्या बिया उपयोगी आहेत.
मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर
जांभूळ आणि त्याची बियाणे दोन्ही मधुमेह रुग्णांसाठी फायदेशीर आहेत. आयुर्वेदानुसार, जांभूळची तुरट चव वारंवार लघवीची समस्या कमी करण्यास मदत करते. २०१६ मध्ये, एक अहवाल एशियन पॅसिफिक जर्नल ऑफ ट्रोपिकल बायोमेडिसिनमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. या अहवालात असे म्हटले आहे की, जांभूळ रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास आणि इंसुलिनच्या पातळीवर नियंत्रण ठेवण्यास मदत करते.
शरीरातील रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी जांभूळची बियाणे प्रभावी :
उच्च रक्तदाब किंवा उच्च रक्तदाबग्रस्त लोकांसाठी, जांभूळची बियाणे वरदानपेक्षा कमी नाहीत. वास्तविक यात आयलिक नावाचे फिनोल अँटीऑक्सिडेंट असते. जे रक्तदाब पातळीतील चढ-उतार रोखण्यास मदत करते. याव्यतिरिक्त, उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी देखील कार्य करते.
पोटाच्या समस्येवर फायदेशीर आहेत :
जांभूळची बियाणे पचन संबंधित समस्यांवर मात करण्यास मदत करतात. याच्या पावडरचे नियमित सेवन केल्याने पोट स्वच्छ राहते. यामुळे बद्धकोष्ठता येत नाही, तसेच डायरिया, आणि आतड्यांसंबंधी अल्सरच्या समस्यांपासून मुक्त होण्यासाठी देखील जांभूळ हे फार उपयुक्त आहे.
रक्त स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त:
जांभूळचे बी रक्त स्वच्छ करण्यास मदत करतात आणि शरीरातून विषारी पदार्थ काढून शरीर स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त आहेत. तसेच अशक्तपणापासून बचाव करण्यासाठीही याचा खूप फायदा होतो. यासाठी रोज सकाळी एक चमचा जांभूळच्या बियांची पावडर एका ग्लास पाण्यात दररोज सकाळी रिकाम्या पोटी घ्यावी. जांभूळच्या सेवनाने आपले हृदय निरोगी रहाते. याशिवाय आपल्या हिरड्या, दात मजबूत ठेवण्यास मदत मिळते. त्वचा आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारते.
Published on: 14 October 2020, 04:59 IST