आपण बघत असतो की अनेकांना सतत मोबाइलवर किंवा लॅपटॉपवर अनेक कामे असतात. यामुळे त्यांच्या डोळ्यांवर ताण येतो. यामुळे अनेकदा डोळ्यातून पाणी येते. मात्र याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. यामुळे हा त्रास वाढतच जातो. असे असताना डोळ्याचे पाणी थांबवण्यासाठी काकडीचे घरगुती उपाय करणे तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते यामुळे तुम्हाला आराम मिळू शकतो. यामध्ये आपण बटाट्याचा देखील उपयोग करू शकतो. डोळ्यांना थंडावा देण्यासाठी बटाटा खूप फायदेशीर आहे. यासाठी बटाट्याचे पातळ काप करून डोळ्यांवर ठेवा आणि अर्ध्या तासानंतर काढा. यामुळे आपल्याला गारवा मिळू शकतो.
तसेच काकडीचे काप डोळ्यांवर ठेवा आणि काही वेळाने काढा. यामुळे देखील अराम मिळेल. तसेच जेव्हा कधी डोळ्यांना पाणी येण्याची समस्या येत असेल, तेव्हा त्यावेळी डोळे थंड पाण्याने धुवा. यामुळे डोळ्यातील घाण निघून जाईल. डोळे हे आपल्या शरीरातील सर्वात नाजूक अवयव आहे, यामुळे त्याची काळजी घेणे गरजेचे आहे. कधीकधी घाणीमुळे डोळ्यांमध्ये जळजळ देखील होते. यामुळे जास्त धुळीत काम करताना काळजी घेणे गरजेचे आहे.
तसेच डोळ्यांमध्ये जळजळ होत असेल आणि सतत पाणी येत असेल तर यासाठी पाण्यात मीठ मिसळा आणि या पाण्यात कपडा भिजवून डोळ्यांवर ठेवा. यामुळे देखील तुम्ही डोळ्यांना आराम देऊ शकता. तसेच डोळ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी हिरव्या भाज्यांचे सेवन केले पाहिजे. डॉक्टर देखील याबाबत सांगत असताना. यामध्ये गाजर हे आपल्या आहारात नेहेमी असले पाहिजे. यामुळे आपल्याला डोळ्यांचा त्रास कमी होईल. तसेच आपले शरीर देखील चांगले राहील.
तसेच भाज्यांमध्ये असलेले ल्युटीन डोळ्यांच्या समस्या दूर करते. यामुळे भाज्यांचा आहारात समावेश असणे गरजेचे आहे. तसेच हे करून देखील काही फरक पडला नाही, तर तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन आपले डोळे चेक करावेत. आपल्या डोळ्याला नंबर लागला असेल तर तुम्ही चस्मा वापरावा जेणेकरून आपला नंबर कमी होईल. यामुळे तुमचे डोळे निरोगी राहतील.
Published on: 16 February 2022, 02:18 IST