मित्रांनो खरं पाहता च्युइंगमचे अनेक आश्चर्यकारक आरोग्य फायदे आहेत. परंतु अति तिथे माती याप्रमाणे कोणत्याही गोष्टीचे जास्त सेवन केल्यास आरोग्याला हानी पोहोचते. च्युइंगमचे देखील जास्त प्रमाणात सेवन करणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जास्त प्रमाणात च्युइंगम चघळल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो.
तुम्ही सुद्धा च्युइंगम जास्त प्रमाणात चघळत असाल तर आजच तुमची ही सवय बदला, अन्यथा यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया च्युइंगमचे तोटे तरी नेमके काय आहेत.
च्युइंगम खाण्याचे तोटे
पोटाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात
जास्त प्रमाणात च्युइंगम चघळल्याने पोटाचा त्रास होऊ शकतो. च्युइंगममुळे हवा निर्माण होते, त्यामुळे पोटदुखी आणि पोट फुगण्याची समस्या होऊ शकते. छातीत जळजळ देखील होऊ शकते. त्यामुळे च्युइंगम जास्त चघळणे टाळा.
जंक फूड खाण्याची इच्छा जागी होते
जास्त प्रमाणात च्युइंगम चघळल्याने जंक फूड जास्त खाण्याची समस्या उद्भवू शकते. कारण वारंवार च्युइंगम चघळल्याने जंक फूड खाण्याची इच्छा निर्माण होते. हे जंक फूडची भूक वाढवते. यामुळे आपल्या आरोग्याला नाहक त्रास सहन करावा लागतो.
ब्लड शुगरचा त्रास
जास्त प्रमाणात च्युइंगम चघळल्याने रक्तातील साखरेची समस्या उद्भवू शकते. कारण भरपूर च्युइंगम चघळल्याने रक्तातील साखर वाढते. त्यामुळे रक्तातील साखरेच्या रुग्णांनी च्युइंगम चघळणे टाळावे.
दातांसाठी हानिकारक
जास्त प्रमाणात च्युइंगम चघळल्याने दातांची समस्या निर्माण होऊ शकते. कारण जास्त च्युइंगम वापरल्याने दातांना नुकसान होऊ शकते. तसेच त्यामुळे तुमचे दात पडू शकतात. दात निरोगी ठेवण्यासाठी च्युइंगमचे सेवन कमी करावे असा सल्ला दिला जातो.
Published on: 12 May 2022, 10:23 IST