Health

हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला हा डॉक्टर नेहमी देत असतात. कारण हिरवे भाजीपाल्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असे जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि इतर महत्वाचे पोषक घटक असतात. अशा या हिरव्या पालेभाज्यांमध्ये बऱ्याच प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो.

Updated on 27 January, 2022 10:33 AM IST

हिरव्या पालेभाज्या खाण्याचा सल्ला हा डॉक्टर नेहमी देत असतात. कारण हिरवे भाजीपाल्यामध्ये शरीरासाठी आवश्यक असे जीवनसत्वे, खनिजे, फायबर आणि इतर महत्वाचे पोषक घटक असतात. अशा या हिरव्या पालेभाज्यांमध्ये बऱ्याच  प्रकारच्या भाज्यांचा समावेश होतो.

त्यामध्ये फुलकोबी चा देखील समावेश होत असतो. फुल कोबी पासून भाजी, पराठे तसेच कटलेट्स बनवले जातात. तसं तर खायलाही चवदार असतात त्यामुळे लोकांना ते आवडतात. परंतु काही परिस्थितीमध्ये फुलकोबी शरीरास हानी पोचू शकते का? फुलकोबी मध्ये कॅल्शियम, फॉस्फरस महत्वाचे जीवनसत्त्वे आणि अँटिऑक्सिडंट असतात परंतु काही व्यक्तींसाठी फुलकोबी खाणे हानिकारक आहे. या लेखामध्ये आपण त्याबद्दल जाणून घेऊ.

 हे आजार असणाऱ्या व्यक्तींनी फुलकोबी खाऊ नये…..

  • किडनीस्टोनचे रुग्ण- कोबी मध्ये कॅल्शियम भरपूर असते. म्हणून गाल ब्लेडर किंवा किडनी स्टोन असलेल्या लोकांनी फुलकोबी खाऊ नये. कारण यामुळे शरीरात कॅल्शिअमचे प्रमाण वाढते आणि स्टोन जास्त प्रमाणात तयार होण्यास सुरुवात होते
  • गॅस होतो तेव्हा- कोबी मध्ये असे काही तत्वे आढळतात त्यामुळे वाचन समस्या उद्भवू शकते. म्हणून ज्या लोकांना गॅसची समस्या आहे त्यांनी फुलकोबीच्या सेवन करू नये. या स्त्रिया मुलांना स्तनपान देतात त्यांनी फुलकोबी सेवन करू नये. त्यामुळे गॅसची समस्या वाढते.
  • ब्लड क्लॉटची समस्या- कोबी मध्ये विटामिन के भरपूर प्रमाणात आढळते. विटामिन की हे शरीरात ब्लड क्लॉट म्हणून कार्य करते. त्यामुळे जे लोक रक्त जाड करण्यासाठी औषधे घेत आहेत त्या लोकांनी फुल कोबीचे  सेवन करू नये.
  • थायरॉईड रुग्ण- थायराइड दोन प्रकारचे असतात. यामध्ये थायराइड आणि हायपोथायरॉईड असे दोन प्रकार असतात.हायपोथायरॉईड मध्ये ग्लेंडसक्रिय होत नाही. त्यामुळे टी 3,टी 4 हार्मोन्स शरीरात पोहोचत नाही.म्हणून अशा रुग्णांनी फुलकोबी चे सेवन करू नये.

(टीप-ही माहिती विविध स्रोतामार्फत घेतलीअसून वाचकांना माहिती मिळावी हा त्यामागचा उद्देश आहे. त्याच्याशी कृषी जागरण आणि टीम किंवा व्यक्तिगत रित्या आम्ही सहमत आहोत असे नाही.)

English Summary: cauliflower is harmful is some disease like as thyroid,gases etc.
Published on: 27 January 2022, 10:33 IST