Health

Cashew Benefits : सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच बहुतेक आरोग्य तज्ञ निरोगी राहण्यासाठी सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. बहुतेक लोक काजूचे (Cashew) सेवन जास्त करतात. काजू चवीला गोड असते. तसेच काजू अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरतात. त्याचबरोबर अनेकांना काजू भाजून खायला आवडते, पण तुम्ही कधी काजूचे दूध (Cashew Milk) पिले आहे का? नाहीतर नक्की प्या.

Updated on 12 September, 2022 1:42 PM IST

Cashew Benefits : सुका मेवा आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. म्हणूनच बहुतेक आरोग्य तज्ञ निरोगी राहण्यासाठी सुका मेवा खाण्याचा सल्ला देतात. बहुतेक लोक काजूचे (Cashew) सेवन जास्त करतात. काजू चवीला गोड असते. तसेच काजू अनेक प्रकारच्या पदार्थांमध्ये वापरतात. त्याचबरोबर अनेकांना काजू भाजून खायला आवडते, पण तुम्ही कधी काजूचे दूध (Cashew Milk) पिले आहे का? नाहीतर नक्की प्या.

कारण काजूच्या दुधात (Cashew Milk Benefits) जीवनसत्त्वे, प्रथिने, खनिजे, फॅटी ऍसिडस्, कॅल्शियम, लोह, आहारातील फायबर, झिंक आणि फॉस्फरस इत्यादी अनेक पोषक घटक असतात. जर तुम्हाला लैक्टोज असहिष्णुता असेल तर काजूचे दूध प्या. या दुधामुळे अनेक समस्या दूर होतात.

काजूचे आरोग्य फायदे

हृदय निरोगी ठेवते 

काजूचे दूध प्यायल्याने हृदय निरोगी (Health Benefits) राहते. यामध्ये असलेले मोनोअनसॅच्युरेटेड फॅटी अॅसिड तुमचे हृदय निरोगी (Human Heart) ठेवू शकते. याशिवाय यामध्ये कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नसते, ज्यामुळे तुम्ही कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात ठेवू शकता. काजूच्या सेवनाने रक्तदाब कमी करता येतो. अशा परिस्थितीत हृदय निरोगी ठेवण्यासाठी काजू खूप फायदेशीर ठरू शकतो.

वजन कमी करते

तुमचे वाढते वजन कमी करण्यासाठी काजूचे दूध प्रभावी आहे. त्यात अॅनाकार्डिक अॅसिड नावाचे बायोटॅक्टिक कंपाऊंड भरपूर असते, जे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ देत नाही. वजन कमी करायचे असेल तर काजूचे दूध नियमित प्या.

कर्करोगाचा धोका कमी करतो

काजूमध्ये भरपूर प्रमाणात अँटिऑक्सिडेंट असतात, ज्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो. यामध्ये असलेले अॅनाकार्डिक अॅसिड, कार्डोल, कार्डॅनॉल, बोरॉन शरीरात कर्करोगाच्या पेशी वाढू देत नाहीत. यामुळे कर्करोग टाळता येतो.

काजू दूध कसे तयार करावे?

काजूचे दूध तयार करण्यासाठी 1 कप काजू घ्या. त्यात 1 कप पाणी घालून मिक्सरमध्ये मिसळा. यानंतर काजू गाळून घ्या. उरलेल्या काजूमध्ये पुन्हा पाणी घालून बारीक करा.  त्यानंतर ते गाळून घ्या. अशा प्रकारे तुम्ही काजूचे दूध घेऊ शकता. जर तुम्ही शाकाहारी असाल किंवा लैक्टोज असहिष्णु असाल तर काजूचे दूध प्या. त्यात कॅलरीज खूप कमी असतात.

English Summary: cashew benefits cashew milk benefits
Published on: 12 September 2022, 01:42 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)