corona patients : सध्या देशात कोरोनाचे सत्र वाढतच आहे. मध्यंतरी शिथिल झालेल्या कोरोना रुग्णांची संख्या आता दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी अधिक काळजी घेणं गरजेचं आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्या झपाट्याने वाढत आहे. आज केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात नव्या कोरोना रुग्णांची संख्या तब्बल सात हजाराच्या पार गेली आहे. गेल्या 24 तासांत 7,240 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत.
तर सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 32 हजाराच्या पार गेलीय. सध्या त्यांच्यावर उपचार सुरु असून कोरोनानियमांत आता बदल करण्यात येत आहेत. देशात कोरोनाची चौथी लाट येऊ नये यासाठी नवीन नियमावली जारी करण्यात आली आहे. दरम्यान मुंबई मध्ये देखील महापालिकेने कोरोनाबाबत मोठे निर्णय घेतले होते. आरोग्य यंत्रणा पुन्हा एकदा सतर्क झाल्या असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडूनही राज्यांना खबरदारी घेण्याच्या सूचना जारी करण्यात आले आहेत.
जाणून घ्या आजची देशातील कोरोना आकडेवारी
नवे कोरोना रुग्ण - 7,240
सक्रिय कोरोना रुग्ण - 32,498
बरे झालेले रुग्ण - 3,641
कोरोनामुळे मृत्यू झालेले रुग्ण - 8
एकूण मृत्यू - 5,24,723
नागरिकांचे लसीकरण - 194 कोटी 59 लाख 81 हजार 691
कोरोनाने पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने नागरिकांची चिंता वाढली आहे. पुन्हा एकदा मास्कचा वापर करण्याचा नियम जारी करण्यात आला आहे. कोरोना टेस्टची संख्या वाढवण्यावर भर देण्यात आली आहे . 12 ते 18 या वयोगटातील मुलांचे लसीकरण वाढवण्याबाबत सूचना जारी केल्या आहेत. कोरोना आटोक्यात आणण्यासाठी बुस्टर डोसची संख्या वाढवण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.
शेतकऱ्यांनो काळजी घ्या; झाडाचा आसरा घेणं मेंढपाळ्याला पडलं महागात...
राज्यातही कोरोनाने सगळ्यांचं टेन्शन वाढवलंय. काल म्हणजेच बुधवारी राज्यात दोन हजारपेक्षा जास्त नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते. त्यातल्या त्यात
निम्याहून अधिक रुग्णसंख्या ही एकट्या मुंबईत आढळून आली होती. दरम्यान मुंबईसह उपनगरांमध्येही कोरोनाचा धोका वाढतच चाललाय. पालघर, ठाणे नागपूर,तसेच पुण्यातही रुग्णसंख्या वाढत आहे.
पुन्हा एकदा मास्क सक्ती?
कोरोनाचा प्रभाव कमी झाल्याने राज्य सरकारने मास्क सक्ती हटवली व मास्कचा निर्णय हा ऐच्छिक ठेवण्यात आला. मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा राज्यात मास्क सक्तीची चर्चा सुरु झाली आहे. सध्या गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्ती करण्यात आली आहे. कोरोना रुग्णांची संख्या वाढतच राहिली तर पुहा एकदा मास्क सक्तीचा नियम लागू होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
महत्वाच्या बातम्या:
खत विक्रीमध्ये शेतकऱ्यांची लूट; कृषी विभागाने खत विक्रेत्यांना दिला मोठा दणका
अबब! जखमी माकडीण थेट आली क्लीनिकमध्ये; आगळ्यावेगळ्या प्रकाराची राज्यभर चर्चा
Published on: 09 June 2022, 05:31 IST