Health

उन्हाळ्यात उसाचा रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे.

Updated on 12 May, 2022 10:58 PM IST

 उन्हाळ्यात उसाचा रस ताजा आणि थंडगार पिण्याचा आनंद काही वेगळाच असतो. उसाचा रस हे नैसर्गिक पेय आहे.

 उसाचा रस फक्त तुमचा गर्मी पासूनच बचाव करत नाही तर बऱ्याच आजारापासून नही दूर ठेवतो उसाच्या रसापासून भरपूर ऊर्जा देखील मिळते.

 उसाचा रस हा एक अतिशय स्वस्थ आणि फायदेशीर पेय आहे. त्यात कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस सारखे आवश्यक पोषक तत्वे असतात. ते हाडे मजबूत करतात आणि दातांची समस्या देखील कमी करते.त्याचबरोबर या रसात कर्करोग आणि मधुमेहासारख्या प्राणघातक रोगांशी लढण्याची शक्ती देखील असते.

 काही लोकांना उसाच्या रसातील हा गोडवा फारसा आवडत नाही. त्यामुळे ते याकडे दुर्लक्ष करतात आणि कोल्ड्रिंक्सकडे  वळतात. मात्र कोल्ड्रिंक्स मध्ये असणारे केमिकल आपल्या शरीराला हानीकारक असतात. या उलट उसाच्या रसा मध्ये कॅल्शियम, पोटॅशियम, लोह, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस यासारखे पोषक असतात. गर्भवतींसाठी हे खूप उपयोगी आहे. उसाचा रस फक्त गर्मी पासून बचाव करीत नाही तर बऱ्याच आजारांपासून दूर ठेवतो.

 उन्हाळ्यामुळे डीहायड्रेशन ची भीती सतत असते. उसाचा रस पिल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो. आज आपण या लेखात उसाचे रस पिण्याचे काय फायदे आहेत याबद्दल जाणून घेणार आहोत.

  • उसाचा रस पिण्याचे फायदे….

1) कृत्रिम थंडपेय शरीराला तात्पुरता थंडावा देतात खरी पण याचे दुष्परिणाम खुप आहेत. या उलट उसाच्या रसाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत.

2) उसाचा रस नाशवंत असल्यामुळे तो  पिण्याआधी ताजा असणे फार महत्त्वाचे आहे.

3) कावीळ झाली असल्यास उसाचा रस किंवा रोज सकाळी उस खाल्ल्यास का वेळ लवकर बरी होण्यास मदत होते.

4) उन्हाळ्यात डीहायड्रेशन ची भिती सतत असते त्यामुळे उसाचा रस प्यायल्याने डिहायड्रेशन पासून बचाव होतो.

5) उसाचा रस खोकला, दमा, मूत्र रोग, आणि किडनीशी संबंधित रोगावर देखील फायदेशीर आहे.

6) उसाचा रस प्यायल्याने तोंडातील दुर्गंधी पासून मुक्ती मिळते आणि बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध होतो. त्यामुळे दातांना होणाऱ्या इन्फेक्शन पासून बचाव आणि त्यांना निरोगी ठेवण्यास मदत होते.

7) उसाचा रस कावीळ या रोगावर अत्यंत गुणकारी आहे.कावीळ होऊ नये म्हणून उसाचा रस नेहमी पिणे  फायदेशीर आहे.

8) उसाचा रस प्यायल्याने त्वचा उत्तम राहते. यामुळे पिंपल्स, चेहऱ्यावरचे डाग दूर होतात आणि स्कीनला हायड्रेटेड ठेवण्यास मदत होते.

9) उसाचा रस ऊर्जेचा बनवतं.यामुळे तुम्हाला फक्त ऊर्जाच मिळत नाही तर उन्हापासून बचाव करून शरीराला शांत ठेवण्यास देखील मदत होते.

 

10) उसाचा रस हा नैसर्गिक असल्यामुळे लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत सर्वजण पिऊ शकतात. फक्त एक ते चार वर्षापर्यंतच्या बालकांनी मात्र उसाचा रस थोड्या प्रमाणात घ्यावा.

 महत्वाच्या बातम्या

नक्की वाचा:खरं काय! ड्रीप इरिगेशनसाठी 'इतकं' मिळतं अनुदान; वाचा याविषयी

नक्की वाचा:साखर आयुक्तांचा मायक्रो प्लान! अतिरिक्त ऊस गाळपासाठी साखर आयुक्तांनी बनवला हा मायक्रो प्लान

English Summary: cane juise is so helpful to human health a nd give so many energy to body
Published on: 12 May 2022, 10:58 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)