Health

आपल्या शरीरासाठी कॅल्शियम खूप महत्वाचे आहे.

Updated on 31 May, 2022 11:37 AM IST

आज आम्ही तुमच्यासाठी कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणाऱ्या आजारांची माहिती घेऊन आलो आहोत ज्याच्या सहाय्याने आपण समजू शकता की आपल्या शरीरात कॅल्शियमची कमतरता आहे की नाही. चला तर जाणुन घेउयात कॅल्शियम कमतरतेमुळे कोणते आजार होतात ?ज्या व्यक्तीला कॅल्शियमची कमतरता असते, त्याची हाडे कमजोर होतात ज्यामुळे त्याचे सांधे आणि स्नायू दुखू लागतात. तो माणूस जास्त चालू शकत नाही किंवा जास्त काळ उभे राहू शकत नाही. ज्याच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते अशा व्यक्तीला हाडांच्या तुटण्याचा धोका असतो.

जर तुम्हाला सतत अंग दुखणे अथवा थकवा जाणवत असेल तर तुमच्यामध्ये कॅल्शियमची कमतरता असू शकते. कॅल्शियमच्या कमीमुळे तुम्हाला लवकरच थकवा येतो. थोडे काम करून किंवा चालून कंटाळा आला आणि विश्रांती घ्यावी असे वाटते. यामुळे, आपण तणाव आणि नैराश्य येत. जे आपल्या आरोग्यासाठी अजिबात चांगले नाही.आपले नखे पुन्हा पुन्हा तुटत असतील तर आपल्या शरीरात कॅल्शियमचा अभाव असल्याचे हे लक्षण आहे. नखे वाढण्यासाठी कॅल्शियम आवश्यक आहे. जेव्हा शरीरात त्याचे प्रमाण योग्य नसते तेव्हा नखे कमकुवत होऊ लागतात आणि तुटू लागतात.

कॅल्शियमच्या कमतरतेमुळे मुतखडयासारखे आजार देखील उद्भवू शकतात.कॅल्शियमच्या कमतरतेमुळे अशक्तपणा येतो, केसांच्या वाढीमध्ये कॅल्शियमची महत्त्वपूर्ण भूमिका असते. या अभावामुळे केस गळतात आणि कोरडे होते. आपल्याला अशी समस्या जाणवत असल्यास ते शरीरात कॅल्शियमच्या कमतरतेचे लक्षण असू शकते.माणसाला वयानुसार किती प्रमाणात कॅल्शियमची गरज असते?1 ते 3 वर्ष दररोज 700 मिलीग्रॅम4 ते 8 वर्ष दररोज 1,000 मिलीग्रॅम9 ते 18 वर्ष दररोज 1,300 मिलीग्रॅम19 ते 50 वर्ष दररोज 1,000 मिलीग्रॅम गरोदर महिला अथवा स्तनपान देणाऱ्या महिला दररोज 1,000 मिलीग्रॅम

51 ते 70 वर्षाचे पुरूष दररोज 1,000 मिलीग्रॅम 51 ते 70 वर्षाच्या महिला दररोज 1,200 मिलीग्रॅम 70 वर्षांच्या वरील माणसे दररोज 1,200 मिलीग्रॅ नोंद-आपण या माहितीचा वापर कोणत्याही आरोग्य समस्येचे निदान किंवा उपचार अंमलात आणण्यापूर्वी कृपया आपल्या तज्ज्ञांचा व डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.या माहीती बद्दल जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही वैयक्तिक आम्हाला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नांचे लवकरात लवकर निवारण करू!ज्या व्यक्तीला कॅल्शियमची कमतरता असते, त्याची हाडे कमजोर होतात ज्यामुळे त्याचे सांधे आणि स्नायू दुखू लागतात. तो माणूस जास्त चालू शकत नाही किंवा जास्त काळ उभे राहू शकत नाही. ज्याच्या शरीरात कॅल्शियमची कमतरता असते अशा व्यक्तीला हाडांच्या तुटण्याचा धोका असतो.

 

संकलन: नितीन जाधव  

 स्रोत:- आरोग्यविद्या

९१९०८२५५६६९४

English Summary: Calcium deficiency causes illness
Published on: 31 May 2022, 11:37 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)